काही लोकांना अफवा उठवायला आवडतात - देवेंद्र फडणवीस
By श्रीकिशन काळे | Updated: August 6, 2023 20:44 IST2023-08-06T20:43:11+5:302023-08-06T20:44:12+5:30
केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह हे आज पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते.

काही लोकांना अफवा उठवायला आवडतात - देवेंद्र फडणवीस
पुणे: काही लोकांना अफवा उठवायला फार आवडतं किंवा माध्यमांनी खात्री करून बातम्या द्यायला हव्यात. जे पतंगबाजी करताहेत, त्यांना विनंती आहे की, काही तरी आपला स्तर ठेवा आणि माध्यमांनी देखील याविषयी खात्रीलायक बातम्या द्याव्यात, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केले.
केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह हे आज पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते. त्यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाचे जयंत पाटील हे शाह यांना भेटले, अशी अफवा सकाळपासून सुरू होती. त्याविषयी फडणवीस हे पुण्यातील एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा त्यांना या शाह-पाटील यांच्या भेटीविषयी विचारले. तेव्हा त्यांनी काही लोकांना अफवा उठवायला फार आवडते, असा टोला लगावला. केवळ ते पतंगबाजी करत आहेत. माध्यमांनी देखील खात्री करूनच बातम्या द्याव्यात, अशी विनंतीही त्यांनी केली.