शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विघ्नसंतोषी भूमिकेची कीव येते,आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही: महापौर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 21:28 IST

पुण्यात काय पण जगात कुठलाही हिंदू कचऱ्याच्या कंटेनर मध्ये गणेश विसर्जन करणार नाही..

ठळक मुद्देआपल्या शहराचे नाव खराब होणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे. विसर्जन हौद प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आयुक्तांचे आश्वासन 

पुणे : घरातील गणपतीचे घरातच विसर्जन करा या आवाहनाला पुणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पण अशावेळी खोटे आरोप करून काही विघ्नसंतोषी मंडळी घाणेरडी भूमिका मांडत आहेत, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, अशा शब्दांत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फटकारले.        पुण्यात काय पण जगात कुठलाही हिंदू कचऱ्याच्या कंटेनर मध्ये गणेश विसर्जन करणार नाही. पुणे महापालिकेने फिरत्या हौदाचे काम ज्या एजन्सीला दिले होते, त्या एजन्सीने गेल्या वर्षीचे गणेश विसर्जन करिता वापरले गेलेले केवळ दोन हौद यावेळी वापरले होते. वर्षभर गोडाऊन मध्ये वापरा विना पडून राहिल्याने,  त्यांचा रंग उडाला होता व त्या हौदाना चिखल लागलेला होता. असे स्पष्टीकरण देत मोहोळ यांनी, ते कचऱ्याचे कंटेनर नव्हते असा दावा केला आहे.      गतवर्षी दीड दिवसाच्या १४ हजार गणेश मूर्तींचे विसर्जन झाले होते. यावर्षी ३० फिरत्या हौदाच्या माध्यमातून केवळ १ हजार २०० मूर्तींचे विसर्जन झाले असून, १२ हजार ८०० मूर्तींचे घरच्या घरीच विसर्जन झाल्याचे सांगून, मोहोळ यांनी पुणेकरांचे आभार मानले. तसेच ५ व्या, ७ व्या व १० व्या दिवशीही घरच्या गणपती चे घरीच विसर्जन करावे असे आवाहन केले.      आपल्या शहराचे नाव खराब होणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे. छोटा विचार, छोटी शक्ती, छोटी क्षमता असलेल्या व्यक्ती याबाबत बोलत असले तरी त्याकडे आम्ही लक्ष देत नाही असेही मोहोळ म्हणाले.-------- विसर्जन हौद प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचे आयुक्तांचे आश्वासन  गणेश विसर्जन करण्याकरिता फिरत्या हौद रथात टाक्यांऐवजी कचऱ्याचे कंटेनर वापरल्याच्या आरोप करीत मनसेच्यावतीने संबंधितावर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली. यावेळी सदर एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवMNSमनसेMayorमहापौर