दर्शनबारीचा प्रश्न सोडवणार : नानासाहेब पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST2020-12-06T04:10:36+5:302020-12-06T04:10:36+5:30
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे शुक्रवारी (दि.४) रात्री उशिरा पटोले यांनी दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते. ...

दर्शनबारीचा प्रश्न सोडवणार : नानासाहेब पटोले
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे शुक्रवारी (दि.४) रात्री उशिरा पटोले यांनी दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते. मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित तसेच बहुचर्चेत असलेल्या दर्शनबारी आरक्षणाच्या जागेवर जाऊन नानासाहेब पटोले यांनी पाहणी केली. त्यांनतर भक्ती सोपान पुलावरून इंद्रायणी नदीची पाहणी केली. मात्र पवित्र इंद्रायणीची सध्याची झालेली अवस्था पाहून त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. इंद्रायणी प्रदूषण मुक्त व्हावी या भावनेतून लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तिचे पावित्र्य जोपासण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगितले.
दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन मंदिरात आळंदी विकास आराखड्यासंदर्भात त्यांनी आढावा बैठक घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्तिकीवारीत आवश्यक ती खबरदारी घेऊन सोहळा संपन्न करण्याच्या सूचना पटोले यांनी देवस्थान कमिटीला दिल्या. शेवटी आळंदीतील कबीर मठाला त्यांनी सदिच्छा भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली.
- तीर्थक्षेत्र आळंदीला विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी भेट दिली.