सोलापूर जिल्ह्याच्या मल्लांनी गाजविले दोन्ही आखाडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 06:25 AM2020-01-06T06:25:35+5:302020-01-06T06:25:44+5:30

६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रविवारचा दिवस सोलापूर जिल्हा संघाच्या मल्लांनी गाजविला.

Solapur district malls have both arena! | सोलापूर जिल्ह्याच्या मल्लांनी गाजविले दोन्ही आखाडे!

सोलापूर जिल्ह्याच्या मल्लांनी गाजविले दोन्ही आखाडे!

googlenewsNext

पुणे : ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रविवारचा दिवस सोलापूर जिल्हा संघाच्या मल्लांनी गाजविला. कालिचरण सोलनकर (गादी विभाग : ७० किलो ), वेताळ शेळके (गादी विभाग : ८६ किलो), प्रशांत जगताप (माती विभाग : ८६ किलो), शुभम चव्हाण (माती विभाग : ९२ किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले.
पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. गादी विभागातील ७० किलो वजन गटात अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या कालिचरण सोलनकर याने पुणे जिल्ह्याच्या दिनेश मोकाशीवर ११-५ गुणांनी बाजी मारली. अहमदनगरच्या विकास गोरेने लातूर जिल्ह्याच्या अलिम शेखला १५-३ ने नमवून कांस्य जिंकले. कांस्यपदकाच्या दुसऱ्या लढतीत पिंपरी-चिंचवडच्या योगेश्वर तापकीरने औरंगाबादच्या कृष्णा गवळीचा १०-० ने पराभव केला.
८६ किलो गादी विभागात सोलापूर जिल्ह्याच्या वेताळ शेळकेने जालन्याच्या बाबासाहेब चव्हाणवर ८-० ने सरशी साधत सुवर्णपदक पटकावले. धुळ्याच्या हर्षल गवते व रमेश कुकडे यांच्या वाट्याला कांस्यपदक आले. ९२ किलो माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्याच्या शुभम चव्हाणने साताºयाच्या जयदीप गायकवाडवर ८-० ने मात केली. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत बीडच्या अमोल मुंडेने लातूरच्या प्रदीप काळेला चितपट केले.
पहिल्या सत्रामध्ये माती विभागात सोलापूरचा प्रशांत जगताप याने अहमदनगरच्या आकाश भिंगारे याच्यावर ८-२ गुणांनी सरशी साधून सुवर्णपदक पटकावले. २२ वर्षीय प्रशांतने ‘महाराष्ट्र केसरी’च्या पदार्पणात सोनेरी मोहोर उमटवण्याचा पराक्रम केला. पुण्याच्या संतोष पडळकर याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने सांगलीच्या रणजित पवारला १०-० ने सहज नमविले.
७० किलो गटात कोल्हापूर शहर संघाचा नितीन पवार व कोल्हापूर जिल्ह्याचा मच्छिंद्र निवंगरे यांच्यात अटीतटीची लढत झाली. दोघांनीही ४-४ गुण मिळविले. मात्र निर्धारित वेळेतील अंतिम गुण हा नितीनने पटकाविल्याने त्याला विजेता घोषित करण्यात आले.
>सचिन येलभर, आदर्श गुंड यांची आगेकूच
महाराष्ट्र केसरी खुल्या गटाच्या गादी विभागातील तिसºया फेरीत मुंबई उपनगरच्या सचिन येलभरने कोल्हापूर शहराच्या समीर देसाईवर ५-२ ने विजय मिळविला. साताºयाच्या प्रवीण सरकने वर्ध्याच्या संतोष जगतापला ७-० गुणांनी हरविले. पुणे जिल्ह्याच्या आदर्श गुंडने रायगडच्या कुलदीप पाटीलवर तांत्रिक गुणाधिक्याने सहज विजय मिळविला. पुणे शहराच्या अभिजित कटकेने सोलापूरच्या योगेश पवारला
६-० ने पराभूत केले.
तिसºया फेरीचे इतर निकाल : गादी विभाग : हर्षवर्धन सदगिर, नाशिक जिल्हा विवि संतोष गायकवाड, मुंबई उपनगर : ५-२. संग्राम पाटील, कोल्हापूर शहर विवि सुनील शेवतकर, वाशिम : २-१. सागर बिराजदार, लातूर विवि गुलाब आगरकर, अमरावती : ४-१ ने विजय मिळवला. अक्षय मंगवडे, सोलापूर विवि विष्णू खोसे अहमदनगर : ४-३.
माती विभाग : संतोष दोरवड, रत्नागिरी विवि नयनेश निकम, नांदेड : १०-०. गणेश जगताप, हिंगोली विवि दत्तात्रय नरळे, गोंदिया : ७-०. सिकंदर शेख, बाला रफिक शेख, बुलडाणा चितपट वि. उमेश शिरोडे, वर्धा. तानाजी झुंजुरके, पुणे शहर चितपट वि. विलास डोईफोडे, जालना. संदीप काळे, मुंबई पूर्व चितपट वि. पोपट घोडके, नाशिक जिल्हा. ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जमदाडे, सोलापूर चितपट वि. धीरज सरवदे, सोलापूर शहर.

Web Title: Solapur district malls have both arena!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.