शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ला सोसायट्यांचा मिळतोय सकारात्मक प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 12:24 IST

महापालिकेने बांधकामाला मंजुरी देतानाच खासगी इमारतींना  ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक केले आहे. 

ठळक मुद्देपुणे महापालिका : जलजागृतीसह पालिकेचा ‘जलयुक्त शहर’ उपक्रमस्वयंसेवी संस्थाही करताहेत कामबांधकाम विभागाने गेल्या पाच वर्षांत भोगवटा प्रमाणपत्र दिलेल्या २१८४ इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे अपेक्षितया कराची सवलत घेणाऱ्या सोसायट्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र

पुणे :  राज्यातील सर्व शासकीय व खासगी इमारतींवर ‘रुफ टॉप रेन हार्वेस्टिंग’ करण्याचे आदेश राज्य शासनाने फेब्रुवारी २००२ मध्ये दिले होते. महापालिकेने बांधकामाला मंजुरी देतानाच खासगी इमारतींना  ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ बंधनकारक केले आहे. दरवर्षी शेकडोने तयार होणाऱ्या इमारतींपैकी किती इमारती हा प्रकल्प शेवटपर्यंत सुरू ठेवतात हा खरा प्रश्न आहे. सर्व मंजुºया आणि परवाने तसेच प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात हे प्रकल्प सुरू असल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून दाखविले जाते. परंतु, पुढील अल्प कालावधीतच हे प्रकल्प गुंडाळण्यात आल्याचेही दिसून येते. बांधकाम विभागाने गेल्या पाच वर्षांत भोगवटा प्रमाणपत्र दिलेल्या २१८४ इमारतींमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे अपेक्षित होते. यासोबतच पालिकेच्या करसंकलन आणि करआकारणी विभागाकडून रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प करणाऱ्या सोसायट्यांना करामध्ये सवलत दिली जाते. या कराची सवलत घेणाऱ्या सोसायट्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या पाच वर्षांत करसंकलन विभागाने १२ हजार ७९४ सोसायट्यांना हे प्रकल्प राबविल्यामुळे करामध्ये सवलत दिल्याची आकडेवारी आहे. ..........

जलयुक्त शहर ही संकल्पनाआगामी काळात लोकसंख्या वाढत जाणार आहे; परंतु पाण्याचे स्रोत तेवढेच राहणार आहेत. पावसाचे पाणी भूगर्भात सोडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आम्ही जलयुक्त शहर ही संकल्पना राबवित आहोत. सीएसआर आणि अन्य उपक्रमांमधून पाणी भूगर्भात जिरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याला नागरिकांनी साथ द्यावी. - मुक्ता टिळक, महापौर पुणे ......रेनवॉटर हार्वेस्टिंग काळाची गरजनवीन बांधकामाच्या ठिकाणी एनओसीसाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग केले जाते. परंतु, हे प्रकल्प शास्त्रोक्त नसतात. पालिकेकडे हे प्रकल्प तपासण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळच नाही. त्यामुळे अनेक त्रुटी राहतात. अशा सोसायट्या या विषयात काम करणाºया स्वयंसेवी संस्थांना गाठतात. त्यामुळे २००७ मध्ये केलेला कायदा केवळ नावापुरताच राहिला आहे. याविषयी काम करण्याची आवश्यकता आहे.- कर्नल शशिकांत दळवी, क्लायमेट रिएलिटी प्रोजेक्ट इंडिया........असे केले जाते जलपुनर्भरणपावसाच्या पाण्याची साठवण (रेनवॉटर हार्वेस्टिंग) म्हणजे पुनर्वापरासाठी पावसाचे पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून एका मोठ्या जमिनीखालच्या टाकीमध्ये गोळा करतात, तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा (विहीर, शाफ्ट किंवा बोअरहोल), पाझर असलेल्या जलाशयांत साठवतात. पाणी जाळी किंवा इतर साधनांसह दव किंवा धुक्यातूनही गोळा केले जाते. हे माणसासाठी अपेय असलेले पाणी गार्डन, पशुधन, सिंचन वा घरगुती वापरासाठी ............जलपुनर्भरणाचे हे आहेत फायदेपाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. जलसंधारणामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते.जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणाºया विजेच्या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे, पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्यास काही प्रमाणात मदत होते.गच्चीवरील पाण्याच्या संधारणाच्या पद्धती तुलनेने अवलंबण्यास सोप्या आहेत. जलसंधारणाच्या बºयाच पद्धती या घर बांधण्यासाठी, वापरण्यासाठी आणि निगा राखण्यासाठी उपयुक्त. निसर्गात स्वच्छ आणि गोड्या पाण्याची कमतरता असल्यामुळे अधिक गोड्या पाण्याचा पुरवठा करणाºया पावसाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे............पालिकेच्या साडेतीनशे इमारतींवर हे प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.पुण्यात ७५० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो. १० नाट्यगृहे, ७ क्षेत्रीय कार्यालये,  २ व्यापारी संकुल, २८ रुग्णालये, ७ क्रीडागृहे, २१ शाळांचा  समावेश होता.हजार चौरस फुटांच्या छतावर साधारणपणे ७५ हजार लिटर पावसाचे पाणी पडते. मुंबईमध्ये हे प्रमाण ३ लाख लिटर आहे, तर औरंगाबादसारख्या दुष्काळी पट्ट्यातही ८० हजार लिटरएवढे आहे. .........पाच वर्षांतील बांधकाम परवाने आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग2014-15बांधकाम परवाने - 495करात सवलत- 557........2015-16बांधकाम परवाने- 519करात सवलत- 334.....2016-17बांधकाम परवाने- 315करात सवलत- 2783.......2017-18बांधकाम परवाने- 378करात सवलत- 1659.........2018-19बांधकाम परवाने- 477करात सवलत- 3300

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाRainपाऊसWaterपाणी