सोशल मीडिया ‘सोसेना’
By Admin | Updated: September 18, 2014 00:03 IST2014-09-18T00:03:12+5:302014-09-18T00:03:12+5:30
लोकसभा निवडणुकीत याचा मोठा ताप लोकांना झाला होता़, तोच त्रस आता सोशल मीडियावर होऊ लागला आह़े त्यावर कोणाचे र्निबध राहिलेले नाहीत़

सोशल मीडिया ‘सोसेना’
पुणो : महापुरुषांचा बदनामीकारक मजकूर आणि छायाचित्रंमुळे राज्यात अनेक ठिकाणी दंगली झाल्यानंतरही आता निवडणुकीचा ज्वर सुरू होताच राजकीय नेत्यांची व्यंगात्मक, आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर वेगाने फिरू लागली आहेत़ लोकसभा निवडणुकीत याचा मोठा ताप लोकांना झाला होता़, तोच त्रस आता सोशल मीडियावर होऊ लागला आह़े त्यावर कोणाचे र्निबध राहिलेले नाहीत़
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी समर्थकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षातील नेत्यांची असंख्य व्यंगात्मक तसेच अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली होती़ ती छायाचित्रे मोठय़ा प्रमाणावर फिरत होती़ प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर भारतीय जनता पक्षाने मोठय़ा प्रमाणावर केला़, त्यामुळे अशा प्रकारच्या ‘पोस्ट’ भाजपकडून टाकल्या जात असल्याची टीकाही त्या वेळी झाली होती़ निवडणुका संपल्यानंतर त्या ‘पोस्ट’ जवळपास थांबल्या होत्या़
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होताच पुन्हा एकदा अशाच प्रकारची अश्लील आणि बदनामीकारक छायाचित्रे सोशल मीडियावर फिरू लागली आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची निवडणुकीनंतर कशी अवस्था होईल, ते कसे रस्त्यावर येतील, अशा व्यंगात्मक चित्रंचा भरणा अधिक आह़े शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांविषयी मात्र अशा प्रकारची चित्रे आढळून येत नाहीत, त्यामुळे भाजपच्याच प्रचारयंत्रणोकडून अशा प्रकारची चित्रे व्हॉट्स अपवर टाकली जात असल्याचा समज आह़े
याबाबत भाजपचे सोशल मीडिया सेलचे प्रदेश सहसंयोजक मंदार घाटे म्हणाले, ‘अशा प्रकारच्या पोस्ट टाकणो, हा सायबर अॅक्टनुसार गुन्हा असून पोस्ट टाकल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो, असे आम्ही आमच्या कार्यकत्र्याना सांगितले आह़े’
लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकत्र्याशिवाय अनेक मोदीसमर्थक प्रचारात आघाडीवर होत़े त्यांच्याकडून अशा प्रकारे पोस्ट टाकल्या जात होत्या, ही वस्तुस्थिती आह़े आपल्याकडील कोणीही अशी चित्रे तयार करून ती टाकू नयेत़ व्हॉट्सअपवर जरी कोणी तुम्हाला अशी पोस्ट टाकली तरी ती तुम्ही पुढे फॉरवर्ड करू नका, अशा सूचना कार्यकत्र्याना दिल्या आहेत़ याबाबत सायबर क्राईमचे उपायुक्त राजेश बनसोडे यांनी सांगितले, की लोकांची बदनामी होईल, अशा प्रकारचा मजकूर, चित्रे टाकणो हा गुन्हा आह़े याबाबत तक्रार आल्यास चौकशी करून काही आक्षेपार्ह आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल़ (प्रतिनिधी)
च्निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू झाली आह़े त्याचबरोबर आपल्या ग्रुपवर पडणा:या पोस्टमुळे आपण अडचणीत येऊ नये, एखाद्या पक्षाचा प्रचार केला जातो, असे कोणी म्हणू नये, यासाठी ग्रुप अॅडमिन करून ग्रुपवर पोस्ट टाकण्यास सुरुवात केली आह़े या ग्रुपवर कोणीही राजकीय प्रचार करू नये, ज्यामुळे ग्रुप अॅडमिनला त्रस होणार नाही, असा संदेश त्यातून दिला जात आह़े
च्व्हॉट्सअपवर टाकण्यात येणारे फोटो, चित्रे, मजकूर हे तुम्ही तयार केले नसले तरी जर तुम्ही ते फॉरवर्ड केले आणि ज्याला ते मिळाले, त्याने तक्रार केल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो़, त्यामुळे अशा प्रकारच्या पोस्ट टाकताना, फॉरवर्ड करताना काळजी घ्या़