शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
5
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
6
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
7
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
8
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
9
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
10
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
11
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
12
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
13
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
14
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
15
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
16
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
17
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
18
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
19
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
20
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!

विठ्ठलाच्या भक्तीत युवकांचे समाज प्रबोधन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 18:33 IST

मुक्कामाच्या ठिकाणी, भारुडे, भजन, कीर्तन या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले जाते..

ठळक मुद्देया वारीत सातशे वारकरी असून यात तरुणांची संख्या मोठी, वारीचे आठवे वर्ष

अमोल अवचिते 

सासवड : यारे यारे लहान थोर! याती भलते नारी नर ! विठ्ठलाच्या भक्तीत विलीन होऊन अखंडपणे वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी वारकरी संप्रदाय युवा मंच आणि महाएनजीओ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर प्रबोधन केले जात आहे. या वारीत सातशे वारकरी असून यात तरुणांची संख्या मोठी आहे. वारीचे आठवे वर्ष आहे. युवा वारकऱ्यांच्या माध्यमातून पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांची सेवा केली जाते.       वैष्णव धर्म जगती ! वारी चुको न दे वारकरी ! वारकरी सेवक पंथावरी! धर्माचे मर्म ! या ओवीप्रमाणे गरजू वारकऱ्यांना कापडी बूट, औषधे, वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. वारकरी सेवा रथाच्या माध्यमातून वारी केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी, भारुडे, भजन, कीर्तन या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केले जाते.जलसंवर्धन, वृक्षसंवर्धन या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. सहा हजार वेगवेगळ्या रोपांच्या बियांचे  वाटप केले आहे.व्यसन मुक्तीवर देखील काम केले जाते.    ज्यांना वारीला येता येत नाही अशा भक्तांना व्हाट्स अप ग्रुपच्या माध्यमातून वारीचे क्षणाचे फोटो, पाठवले जातात.महाएनजीओ फेडरेशन ने या दिंडीला मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. व्हाट्सएपच्या माध्यमातून युवा पिढीला जोडले आहे. वारीतील दिंडीत जाऊन मदत केली जाते, अशी माहिती वारकरी युवा मंचचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी दिली. वारी म्हणजे मॅनेजमेंट आहे. अहंकार नाही, धर्म जात नाही, भजन म्हणजेच प्रमाण, सगळे समान आहेत. असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :PurandarपुरंदरPandharpur Wariपंढरपूर वारीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी