सामाजिक उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा

By Admin | Updated: August 17, 2015 02:29 IST2015-08-17T02:29:19+5:302015-08-17T02:29:19+5:30

पुणे शहरातील विविध संस्था-संघटना, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्ये देशाचा ६९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

Social activities celebrate Independence Day | सामाजिक उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा

सामाजिक उपक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा

पुणे : पुणे शहरातील विविध संस्था-संघटना, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालयांमध्ये देशाचा ६९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शहरात विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ल्ल कोथरूड भेलकेनगर परिसरात अंध मुलींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गिरीश भेलके यांनी आयोजिलेल्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘स्वातंत्र्य कुणा, स्वातंत्र्य कुठे’ या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. नगरसेवक निरफराके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण या वेळी उपस्थित होत्या.
ल्ल नॅशनल पब्लिक स्कूल कात्रज या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. सेव्ह पुणे हिल्स इनिशिएटिव्हचे अध्यक्ष दीपक बिडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. कृष्णदृष्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या वतीने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सम्राट अशोक सेना आयोजित कार्यक्रमात जगन्नाथ गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
ल्ल एकजूट युवक संघाच्या वतीने सिद्धार्थनगर भागात सफाई कामगार बंधू-भगिनींचा सत्कार संघाचे अध्यक्ष विष्णू सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ मजूर शिवाजी गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ल्ल शिवाजीनगर मतदारसंघातील पोलीस सत्कार समारंभ बाळासाहेब बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. विश्वजित कदम, उपमहापौर आबा बागूल आदी मान्यवर उपस्थित होते.
ल्ल जनता दल सेक्युलर आयोजित कार्यक्रमात हनुमान व्यायाम मंडळाचे सरचिटणीस हनुमान ननावरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ल्ल श्रीनाथ मित्र मंडळातर्फे अशोक गायकवाड यांच्या हेस्ते ध्वजारोहण करण्यात आले. फुले, शाहू आंबेडकर विचार मंचतर्फे ध्वजारोहण, राष्ट्रगीत, जनजागरण अभियान झाले. मंचाचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, समता सैनिक दलाचे संस्थापक-सदस्य शंकर गायकवाड उपस्थित होते.
ल्ल भारिप-बहुजन महासंघ पुणे शहर यांच्यातर्फे भीमनगर-मुंढवा या ठिकाणी नगरसेवक अण्णा म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. नवमहाराष्ट्र मंडळ भवानी पेठ येथे अपंग संघटनेचे अध्यक्ष प्रशांत घोलप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रातर्फे विश्राम कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मतिमंद शाळेतील मुलांनी क्रांतिकारकांची वेशभूषा परिधान केली होती.
ल्ल आझम कॅम्पसमध्ये हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मुनव्वर पीरभॉय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पी. ए. इमानदार उपस्थित होते. महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट कार्यालयात नदीम मुजावर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर चिटणीस अ‍ॅड. शाबीर खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Web Title: Social activities celebrate Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.