शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

...म्हणून यंदाच्या वर्षीही आषाढी वारी पायी नको ; संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 19:07 IST

...तर पायीवारी करणे हे ग्रामस्थ, भाविक व वारकरी यांच्या जीवाशी खेळल्यासारखे होईल.

आळंदी (शेलपिंपळगाव) : सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. कोरोनाची फलटण शहरातील परिस्थिती ही भयंकर व भीतीदायक आहे. फलटण शहर व परिसरात कोरोनाबाधित रुग्ण हे मोठ्या प्रमाणावर आढळून आलेले आहेत व येत आहेत. फलटण शहरासह तालुक्यात कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू सुद्धा झालेले आहेत. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता यंदा सुद्धा आषाढी वारीचा पालखी सोहळा हा पायी नसावा असा अभिप्राय फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला पत्राद्वारे पाठवलेली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून बंद असलेल्या आषाढी वारीला यंदा पोषक वातावरण आहे का ? गावात कोरोनाची परिस्थिती कशी आहे ? याबाबत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे वतीने पालखी मार्गावरील गावांना पत्रव्यवहार करण्यात आलेला होता. त्यानुसार फलटण नगरपालिकेस १६ मे  रोजी लिहलेले पत्र प्राप्त झालेले होते. त्या पत्रानुसार फलटण नगर पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीला फलटण शहरासह परिसरातील कोरोनाची सद्यस्थिती निदर्शनास आणून दिलेली आहे.सध्याची कोरोनाची परिस्थिती जर आहे अशीच राहिली तर पायीवारी करणे हे ग्रामस्थ, भाविक व वारकरी यांच्या जीवाशी खेळल्यासारखे होईल. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे एसटीतुनच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणे योग्य राहील. सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता फलटण शहरात एकही वारकरी येणे योग्य व सुरक्षित वाटत नाही. ज्या वेळेस कोरोनाची परिस्थिती सुधारेल त्या वेळेसच पायी पालखी सोहळ्याबाबत मत व्यक्त करणे हे उचित ठरेल असेही पत्रात स्पष्ट केले आहे. याबाबत देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर म्हणाले, शुक्रवारी (दि.२८) वारी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व वारी संबंधित विश्वस्तांची बैठक आहे. यंदा पायी वारी व्हावी अशी वारकऱ्यांची मागणी आहे, त्यामुळे होणाऱ्या बैठकीत वारी आयोजित करावी अशी मागणी केली जाणार आहे. प्रशासन काय निर्णय घेईल त्यानुसार पुढील धोरण निश्चित केले जाईल.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीcorona virusकोरोना वायरस बातम्या