शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

... तर यंदा माऊलींचा पालखी सोहळा अवघ्या २० वारकऱ्यांसोबत पूर्ण करावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 19:46 IST

आषाढी वारी सोहळा वाटेत कोठेही न थांबवता थेट पंढरपूरला थांबवावा. आता लक्ष शासनाच्या निर्णयाकडे

ठळक मुद्देआता लक्ष शासनाच्या निर्णयाकडे : आळंदी ग्रामस्थांचे मंदिर देवस्थानकडे निवेदन

भानुदास पऱ्हाड -

आळंदी : चालू वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'लॉकडाऊन'चे नियम शिथील न झाल्यास शासनाच्या आदेशाचे पालन आणि वारकऱ्यांचे आरोग्य जपत आषाढी वारी मोजक्याच वारकऱ्यांसह होणार असल्याचे आळंदी देवस्थानने नुकतेच स्पष्ट केले आहे. यापार्श्वभूमीवर आळंदीकर ग्रामस्थांनीही माउलींचा सोहळ्याचे प्रस्थान जेष्ठ वद्य अष्टमीला (१३ जूनला) न करता आषाढ शुद्ध दशमीला अर्थातच ३० जूनला करून यंदाची पायीवारी अवघ्या वीस वारकऱ्यांसमवेत पार पाडण्याची लेखी सूचना मंदिर देवस्थानकडे केली आहे. सोबत सह्यांचे निवेदनही आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे - पाटील यांना आळंदीकरांनी दिले आहे.           यंदा कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशावर महामारीचे संकट आले आहे. महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूरातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तर आळंदीलगत च?्होली बु., मोशी आणि दिघीतही कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आळंदीत आषाढी वारी भरेल की नाही ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी आळंदी देवस्थानने आषाढी वारीसंदर्भात प्रमुख घटकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. त्याअनुषंगाने यंदाच्या वर्षी सोहळा कशा स्वरूपात पार पाडावा याबाबत दिंडीकरी, फडकरी व वारकऱ्यांकडून सूचना मागविल्या होत्या.        यापार्श्वभूमीवर शनिवारी (दि.९) आळंदी ग्रामस्थांनी देवस्थानला लेखी निवेदन दिले. चालू वर्षीचा सोहळा सुरक्षेच्या कारणास्तव अत्यंत साधेपणाने व शासनाच्या नियमांना अधिन राहून पार पाडावा. वारीचा ऐतिहासिक सोहळा असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तो साजरा होणे अपेक्षित आहे. देशातील सध्याची आपत्कालीन व्यवस्था पाहता माउलींचा आषाढी वारी सोहळा हा मुख्य १५ ते २० व्यक्तींच्याच समवेत व्हावा. सोहळ्यात पालखी सोहळा मालक, प्रमुख विश्वस्त, पालखी सोहळाप्रमुख, चोपदार, मानकरी, शिपाई, दिंडीकरी, विणेकरी, टाळकरी, पखवाद वादक, झेंडेकरी, तुळस घेणारी महिला वारकरी आणि पुजारी अशा मोजक्याच लोकांचा सहभाग असावा. तसेच आषाढ शुद्ध दशमीला म्हणजे ३० जूनला सकाळी सहा वाजता माउलींचे मंदिरातून साधेपणाने पंढरपूरकडे प्रस्थान करावे. माउलींच्या पादुका ट्रकमधे किंवा सजवलेल्या रथात ठेवाव्यात असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

.........

थेट पंढरपुरात प्रवेश करावा... आषाढी वारी सोहळा वाटेत कोठेही न थांबवता थेट पंढरपूरला थांबवावा. शासनाच्या नियमानुसार आषाढी एकादशीला (दि.१ जुलै) प्रदक्षिणा व द्वादशीचे पारणे फेडून पुन्हा दुपारी आळंदीकडे प्रयाण करावे. सायंकाळी अथवा रात्री उशिरा आळंदीत माऊलींच्या मंदिरात सोहळ्याची साधेपणाने सांगता करावी असेही आळंदी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस