शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

...म्हणून आता उपमुख्यमंत्री ‘अजितदादां’नी तिसरा डोळा उघडण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 18:06 IST

खासदार सुप्रिया सुळे व विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द मानणारे गाव अशी माळेगावची ओळख आहे.

माळेगाव: ऐतिहासिक वारसा संपन्न व सुसंस्कृत असलेल्या माळेगावाला राजकीय गुन्हेगारीने बदनाम केले आहे. गटातटातील वर्चस्वातुन गेल्या तीन साडेतीन वर्षात गाव अशांत झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भागात तिसरा डोळा उघडण्याची गरज आहे.त्यानंतरच राजकीय गुन्हेगारी संपुष्टात येणे शक्य आहे. 

राष्ट्रवादीचे रविराज तावरे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.खरे तर राजकीय दृष्टिकोनातून माळेगाव हे सातत्याने राजकीय पटलावर चर्चेत असणारे हे गाव आहे.खासदार शरद पवार यांची यशस्वी राजकीय कारकीर्द याच गावातील धुरंधरांनी घडवली आहे.पवार यांचे निवासस्थान याच गावात आहे.तसेच खासदार सुप्रिया सुळे व विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द मानणारे गाव अशी ओळख आहे.

पूर्वी गावात राजकीय गटतट होते.त्यांच्यात वादविवाद होत होता.अपवादाने मारामारी देखील झाली.पण शस्राचा वापर कधीच झाला नाही. त्यांचे वाद शब्दावर मिटायचे व गावात शांतता नांदायची. मात्र सन २०१७ ला झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीपासुन गटातटातील वादाला अधिक जोर आला.दोन गट एकमेकांना पाण्यात पाहु लागले.त्यामुळे गटाचे राजकारणात अधिक व्यापक होऊ लागले. वादविवाद वाढत गेले.

दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीस वर्ष होताच सोशल मीडियाचा वादासाठी वापर होऊ लागला.एक गट सोशल मिडीयावर जाहिरातबाजी करण्यात मग्न होता.तर दुसरा गट त्या विरोधी संदेश प्रसारित करत होता.एखाद्या राजकीय कार्यक्रमात अथवा ग्रामसभेत खडाजंगी होऊ लागली.  गेल्या तीन- चार महिन्यांत गावातील विकासकामे उद्घाटन,कोविड सेंटर,वाढदिवसाचे आक्षेपार्ह फ्लेक्स यावरून मोठा वादंग झाला होता.एका गटाची भांडणे झाली तर दुसरा गट ते भांडण कसे वाढेल याकडे लक्ष देत होता.यामधुन वैयक्तिक खुन्नस वाढत गेली.यातुन काही समर्थकांना मार खावा लागला होता.हा वाद थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दरबारात गेला होता..........वाद आणखी उफाळणारआगामी काळात नगरपंचायत निवडणूक होणार आहे.या काळात गटातटातील वाद आणखी उफाळून येणार आहे.नगरपंचायत निवडणुकीसाठी चांगल्या व निष्कलंक उमेदवारांची गरज आहे.गावातील अनेक युवा पदाधिकाऱ्यांनी गावामध्ये वर्चस्व राखण्यासाठी गावगुंडाना हाताशी ठेवलेले पाहायला मिळतेय.———————————————

टॅग्स :BaramatiबारामतीPoliticsराजकारणCrime Newsगुन्हेगारीAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवार