शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून मी भारत - इंग्लंड कसोटी पाहायला गेलो; शरद पवारांनी सांगितली जुनी आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 15:37 IST

पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एक जुनी आठवण सांगितली

पुणे : पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी एक जुनी आठवण सांगितली.  माझी कित्येक वेळा सत्ता गेली, अशी मिश्कील टिप्पणी करून पवारांनी 1980 मध्ये पुलोद सरकार बरखास्त झाले. आमचं पुलोद सरकार बरखास्त केलं ही बातमी मला रात्री 12 वाजता कळली. लगेचच रात्री तीन ते चार मित्रांना बोलावलं आणि सामानाची आवराआवर केली. सकाळी दुसरीकडे राहायला गेलो. वानखेडे स्टेडियमवर भारत-इंग्लंडचा कसोटी सामना होता. ती दिवसभर पाहायला गेलो असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सत्ता येते आणि जाते. त्याकरिता इतकं अस्वस्थ व्हायची गरज नाही. पण काही लोक फार अस्वस्थ आहेत. त्यांना दोष देता येत नाही. कारण निवडणुकांपूर्वीच  ‘मी येणार येणार’ अशी घोषणा त्यांनी केल्या. मात्र ते घडू शकले नाही, त्यातून ही अस्वस्थता असते, असा टोला पवारांनी देवेंद्र फडणसवींना यावेळी लगावला.

सध्याच्या राज्यातील राजकारणात या गोष्टी पाहायला मिळत नाहीत

''महाराष्ट्रात यापूर्वी कधीच असे नव्हते. राज्यात अनेक वर्षे काम केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जाहीरपणे इतके मतभेद असायचे, की एकमेकांना शब्द वापरण्याबाबत आम्ही कधीच काटकसर  केली नाही. परंतु, संध्याकाळी ते माझ्या किंवा मी त्यांच्या घरी जात असू. औरंगाबादमध्ये आमच्या सभा झाल्या तेव्हा विरोधकांवर तुटून पडलो. सभा संपल्यानंतर तिथले ज्येष्ठ नेते बापूसाहेब काळदाते किंवा अनंत भालेराव या सर्व व्यक्तींबरोबर आमची संध्याकाळ जायची आणि सभेत काय बोललो याचे स्मरणही व्हायचे नाही. ही परंपरा यशवंतराव चव्हाण यांच्यापासून होती. महाराष्ट्राच्या विधीमंडळात नसलो तरी पाहिले आहे की मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, एस.एम जोशी हे विरोधी पक्षातले नेत्यांमधील चर्चा टोकाची असायची पण नंतर तिघेही एकत्र बसून राज्याच्या विकासावर चर्चा करायचे. दुर्देवाने, सध्याच्या राज्यातील राजकारणात या गोष्टी पाहायला मिळत नाहीत अशी खंतही पवारांनी व्यक्त केली.''

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण