शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रावणगावच्या अंगणवाडीमध्ये साप आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 19:55 IST

साधारण पाच ते सहा फूट लांबीच्या धामण जातीच्या सापाने खिडकीतून वर्गात अचानक उडी मारल्याने एकच खळबळ उडाली.

ठळक मुद्देचिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

रावणगाव : रावणगाव (ता. दौंड) येथील गावठाणातील अंगणवाडी केंद्रशाळेमध्ये बुधवारी (दि १०) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास साधारण पाच ते सहा फूट लांबीच्या धामण जातीच्या सापाने खिडकीतून वर्गात अचानक उडी मारल्याने एकच खळबळ उडाली.येथील अंगणवाडी केंद्रामध्ये सध्या २५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु अंगणवाडीला वर्ग खोलीच नसल्याने रावणगाव ग्रामपंचायतीने एक खासगी खोली गेल्या एक वर्षापासून भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिली आहे.  त्याचे भाडेदेखील रावणगाव ग्रामपंचायत देत आहे. परंतु, या खोलीच्या पाठीमागील बाजूच्या खिडकीला संरक्षक झापडी नसल्याने त्या ठिकाणाहून रात्रंदिवस उंदीर, घूस, पाली सतत वर्गाच्या आत-बाहेर प्रवेश करतात.बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर काही मिनिटांतच पिवळ्या रंगाच्या धामण जातीच्या सापाने खिडकीतून वर्गात अचानक उडी मारल्याने अंगणवाडी सेविकांची एकच धावपळ उडाली. परंतु सापाने वर्गात प्रवेश करण्याआधी शाळा सुटली असल्याने अनर्थ टळला. सेविकांनी वर्गात साप आल्याची माहिती ग्रामस्थांना देताच काही तरुण धावत तेथे आले. त्यांनी चिमट्याच्या साह्याने त्या सापाला पकडून एका शेतामध्ये सोडून दिले.त्यानिमित्त येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अंगणवाडी केंद्राला शासनाने नवीन वर्ग खोली बांधण्यासाठी ८ लाख ५० हजार एवढा निधी मंजूर केला आहे. परंतु जोपर्यंत नवीन वर्ग खोली बांधली जात नाही, तोपर्यंत या निरागस चिमुकल्यांना अशा साप, उंदीर आणि घुशींच्या साम्राज्यातच आपला जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागणार आहे.

---------------पंधरा दिवसांत बांधकाम सुरूनवीन वर्ग खोलीच्या बांधकामासाठी शासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे टेंडर पास करून येत्या पंधरा दिवसंतच येथील अंगणवाडीच्या वर्ग खोलीचे बांधकाम सुरू करण्यात येईल.  - प्रवीण माने(बांधकाम व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद पुणे)

------------शासनाकडे पाठपुरावा... रावणगाव गावठाणातील अंगणवाडी वर्ग खोलीच्या बांधकामासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे.  - ललित आटोळे, (माजी सरपंच, रावणगाव)

   

टॅग्स :PuneपुणेsnakeसापStudentविद्यार्थीSchoolशाळा