पुणेकरांकडून स्मार्ट सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2015 02:41 IST2015-08-10T02:40:31+5:302015-08-10T02:41:37+5:30
महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेसाठी सूचना मागवून घेतलेल्या स्पर्धेमध्ये विविध प्रकारचे अॅप महापालिकेने तयार करावेत, शिल्लक राहिलेल्या अन्नासाठी हेल्पलाईन बनवावी

पुणेकरांकडून स्मार्ट सूचना
पुणे : महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेसाठी सूचना मागवून घेतलेल्या स्पर्धेमध्ये विविध प्रकारचे अॅप महापालिकेने तयार करावेत, शिल्लक राहिलेल्या अन्नासाठी हेल्पलाईन बनवावी, शाळा दत्तक घ्याव्यात, उडडणपुलाखालील जागेचा योग्य वापर करावा, अशा अनेक स्मार्ट सूचना पुणेकरांनी केल्या आहेत.
स्मार्ट सिटी योजनेमध्ये सहभागी होण्यासाठीचा प्रोजेक्ट तयार करण्यापूर्वी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी नागरिकांना आॅनलाईन सूचना करण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. यामध्ये ५ लाख नागरिकांनी सहभाग घेऊन ६ हजार सूचना केल्या.
पाणी येणार नाही, वाहतूक बंद राहणार आहे,अशा सूचना देण्याकरिता महापालिकेने अॅप तयार करावे. पीएमपी, लोकल व बीआरटी, रेल्वे यांच्या वेळापत्रकांची माहिती देणारे अॅप तयार करावे, ऐतिहासिक स्थळांविषयी माहिती प्रदर्शित करावी, महापालिकेच्या शाळा सीएसआर अंतर्गत दत्तक घ्याव्यात, उडडणपुलाखालच्या रिकाम्या जागा महिलांकरिता स्वच्छतागृहे, पार्किंगसाठी वापरावीत. शहरात कुठल्या रक्तपेढीत रक्त उपलब्ध आहे, याची माहिती देण्यासाठी अॅप तयार करावे, अशा सूचना केल्या आहेत.