शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

स्मार्ट गर्ल प्लस अ‍ॅप राज्यासाठी ठरणार रोल मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 00:42 IST

जिल्ह्यातील शालेय मुलींना, तसेच महिलांना छेडछाड, नैराश्य, तसेच कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागते.

पुणे : जिल्हा परिषदेने अल्पावधीत विकसित केलेल्या ‘स्मार्ट गर्ल प्लस’ हे अ‍ॅप आता सर्व राज्यांसाठी रोल मॉडेल ठरणार आहे. या मोबाईल अ‍ॅपची दखल विधिमंडळाच्या महिला व बालकल्याण समितीने घेतली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेला बेटी बचाओ, बेटी पढाओचा प्रसार संपूर्ण राज्यभर करण्यासाठी हे अ‍ॅप विकसित करण्याच्या सूचना राज्यातील जिल्हा परिषदांना या समितीने केली आहे.

जिल्ह्यातील शालेय मुलींना, तसेच महिलांना छेडछाड, नैराश्य, तसेच कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागते. त्यांना वेळीच मदत मिळण्यासाठी जिल्हा परिषदेने स्मार्ट गर्ल प्लस हे मोबाईल अ‍ॅप विकसित केले. याद्वारे आरोग्य, शिक्षण, आहार, तसेच रोजगारविषयक मार्गदर्शन महिला, तसेच मुलींना करण्यात येत आहे. याबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी स्वसंरक्षण, आरोग्यविषयक जनजागृती यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. या अ‍ॅपद्वारे कोणत्याही विद्यार्थिनी अथवा महिलेला तज्ज्ञांचा सल्ला घेता येत आहे. याची दखल विधिमंडळाच्या महिला व बालकल्याण समितीने घेतली आहे. राज्यातील सर्व महिला, तसेच मुलींना याचा लाभ व्हावा, यासाठी ‘स्मार्ट गर्ल प्लस’ या अ‍ॅपची माहिती घेऊन याच प्रकारचे अ‍ॅप तयार करण्याच्या सूचना शिफारशीद्वारे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना या समितीने केल्या आहेत. याबरोबरच मुलींच्या सक्षमीकरणाकरिता व सबलीकरणासाठी तातडीने पावले उचलावीत. तसेच मुलींचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्यात यावी, अशी शिफारसही करण्यात आली आहे. याबाबत कार्यवाहीचा अहवाल दोन महिन्यांच्या आत जिल्हा परिषदांनी द्यावा, अशीही सूचना महिला व बालकल्याणच्या समितीने केली आहे.४सुरुवातीपासून जिल्हा परिषदेने महिलांच्या सबलीकरण आणि सक्षमीकरणावर भर दिला असून त्याकरिता ‘स्मार्ट गर्ल प्लस’ अ‍ॅपचा वापर करण्यात येत आहे. हा अ‍ॅप गुगल प्लेस्टोअरमध्ये जाऊन कोणीही डाऊनलोड करू शकतो.४यामध्ये मुलींना सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. शिक्षणासह आरोग्याच्या विविध प्रश्न तज्ज्ञांना विचारण्याची संधी मिळते. त्याद्वारे तज्ज्ञ थेट त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकतात, अशीही सुविधा त्यात आहे. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा प्रचार, प्रसार केल्याने जिल्ह्यात मुलींची संख्या वाढली.महाराष्ट्र विधिमंडळाच्या महिला व बालकांचे हक्क कल्याण समितीने जिल्हा परिषदेच्या स्मार्ट गर्ल प्लस या मोबाईल अ‍ॅपची दखल घेऊन राज्यभर ती राबविण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषद आता राज्याच्या जिल्हा परिषदांसाठी मॉडेल ठरू लागले आहे. त्याकरिता चांगले उपक्रम राबविण्याची जबाबदारी वाढली आहे.- सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

करंजेपूल येथील मॅरेथॉनमध्ये धावले १ हजार ६५० स्पर्धक१६५० धावपटूंचा सहभाग : विजेत्यांना अजित पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरणलोकमत न्यूज नेटवर्कसोमेश्वरनगर : करंजेपूल (ता. बारामती) येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सुमारे १,६५० धावपटूंनी सहभाग नोंदवून संपूर्ण सोमेश्वरनगरी मॅरेथॉनमय केली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर स्पोटर््स अ‍ॅकॅडमी आयोजित बारामती तालुका आजी-माजी सैनिक संघटना व सोमेश्वर कारखाना यांच्या सयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.बक्षीसविजेत्या स्पर्धकांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. सोमेश्वर स्पोटर््स अ‍ॅकॅडमीच्या कायार्बाबत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी माहिती दिल्यावर अजित पवार यांनी मॅरेथॉन आयोजन कमीटीचे अभिनंदन केले व खूप स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष लालासो माळशिकारे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँगेसचे उपाध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, संभाजी होळकर, मधुकर सोरटे, सरपंच वैभव गायकवाड, रमाकांत गायकवाड, आंतराष्ट्रीय पंच रामदास कुदळे व सहकारी, शासन प्रकाश भिलारे, प्रा. पी. एम. गायकवाड आदींच्या हस्ते स्पर्धेची सुरुवात झाली. प्रास्ताविकामधे अ‍ॅड. गणेश आळंदीकर यांनी या स्पर्धेचे आयोजन समर्थ कॉम्प्युटर्स, समर्थ ज्ञानपीठ, विवेकानंद अभ्यासिका, भारत ज्ञानविज्ञान समुदाय, बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ, क्रीडाशिक्षक संघटना इत्यादी संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले असल्याचे सांगून परिसरातील करंजेपूल ग्रामस्थ व क्रीडाप्रेमींचे मोठे योगदान असल्याची माहिती दिली. मुख्य संयोजक जगन्नाथ लकडे यांनी ग्रामीण भागातील तरुणांना वाव मिळावा.आपल्या आरोग्यासाठी सर्वांनी धावले पाहिजे. तर, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे यांनी जगन्नाथ लकडेचा सर्वांनी आदर्श ठेवला, तर निश्चित उद्याचे क्रीडापटू तयार होतील, असे मत व्यक्त केले.स्पर्धेचा निकाल..स्पर्धेत बक्षीस मिळविलेल्या स्पर्धकांची नावे पुरुष खुला गट १० किमी प्रथम के. दिनकर संतू हा ३० मिनिट १४ सेकंदांत, दुसरा क्रमांक रवी अनिल शिवाप्पा ३०.३१, तिसरा बागडे प्रियजित रणजित ३१.२३ सेकंद, महिला प्रथम लडकत यमुना आत्माराम, द्वितीय इक्के अमृता सूरज, तिसरा अहिरे वंदना पुनाजी, १९ वर्षांखालील मुले : प्रथम कारंडे विक्रांत आबासो, द्वितीय पांडोळे लक्ष्मण विठ्ठल, तिसरा जाधव पंकज सुनील, १९ वर्षांखालील मुली : प्रथम पाटील भक्ती राजगोरा (सांगली), दुसरा खरे समीक्षा प्रशांत (पुणे), तिसरा हुंबरे काजल सिंधू (मोढवे), १७ वर्षांखालील मुले : प्रथम बनकर सुहास प्रभाकर (नारायणगाव), दुसरा खडके रोहिदास मच्छिंद्र (सुपे), तिसरा ठोंबरे शरद नामदेव (सुपे), १७ वर्षांखालील मुले : प्रथम तोरवे वनिता धुळा, द्वितीय मोटे वनिता दगडू, तृतीय लिंबरकर आरती विजय सोरटेवाडी, १४ वर्षांखालील : प्रथम पाटील आदित्य आनंद (सांगली), द्वितीय खैरे आदित्य कैलास, खैरेवाडी तृतीय नलवडे रोहित उत्तम (सांगली), मुली : प्रथम तोरवे संगीता धुळा (वाणेवाडी), द्वितीय ठोंबरे रूपाली लालासो, तिसरा जाधव शिवानी गोपीचंद (वडगाव), ४५ वर्षांवरील पुरुष : प्रथम कोरडे रवींद्र दिनकर (सोरटेवाडी), द्वितीय बोडरे राजेंद्र सर्जेराव (सोनगाव), तृतीय भगत शिवाजी राजाराम सुमारे दीड लाख रुपयांचे बक्षिसांचे वितरण या वेळी करण्यात आले. आजी-माजी सैनिक संघटनेचे बारामती तालुकाअध्यक्ष अनिल शिंदे, हनुमंत निंबाळकर, बाळासाहेब शेंडकर, मोहन शेंडकर, योगेश सोळसकर, स्पोटर््स अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष भाऊसाहेब लकडे, उपाध्यक्ष जयश्री लकडे, प्रा. पी. एम. गायकवाड आदींनी उपस्थितांचे स्वागत केले. बाळासाहेब मोटे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश सावंत यांनी आभार मानले. 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका