शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

'ई-टॉयलेट'मुळे स्मार्ट सिटीला बळ मिळेल :  मुक्ता टिळक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 7:34 PM

१०० शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड , १० ई-टॉयलेट आणि हडपसर-सातववाडी येथील ऋषी आनंदवन उद्यानाचे संवर्धन केले जाणार आहे.

ठळक मुद्देशहरातील पहिल्या अत्याधुनिक स्वच्छतागृहाचे डेक्कन कॉर्नर येथे उद्घाटनअत्याधुनिक स्वच्छतागृहामुळे महिलांची सोय होणार

पुणे : ‘वर्दळीच्या ठिकाणी स्वच्छतागृहांअभावी महिलांची कुचंबना होते. डेक्कन, फर्ग्युसन रस्ता अशा वर्दळीच्या भागात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक स्वच्छतागृहामुळे महिलांची सोय होणार आहे. या ‘ई-टॉयलेट’मुळे पुण्यासाठी महत्वाकांक्षी असलेल्या स्मार्ट सिटी उपक्रमाला बळ मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या, तर शहराचा चेहरामोहरा बदलेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे पाण्याचा गैरवापर होणार नाही’, असे प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी केले.लायन्स क्लब आॅफ पुणे गणेशखिंड यांच्याकडून महिलांसाठी शहरात उभारण्यात येणा-या १० ई-टॉयलेटपैकी पहिल्या ई-टॉयलेटचे टिळक यांच्या हस्ते डेक्कन कॉर्नर येथील खंडूजी बाबा चौकात उद्घाटन झाले. याप्रसंगी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, नगरसेवक प्रवीण चोरबेले, लायन्स क्लबचे प्रांतपाल रमेश शहा, माजी आंतरराष्ट्रीय संचालक प्रेमचंद बाफना, माजी प्रांतपाल द्वारका जालान, संदीप मालू, लायन्स क्लब आॅफ पुणे गणेशखिंडचे अध्यक्ष विजय भंडारी, सचिव राजीव अगरवाल, सहसचिव सुनील शहा, कोषाध्यक्ष संजय डागा व डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन सिग्नेचर प्रोजेक्ट श्याम खंडेलवाल आदी उपस्थित होते. ई-टॉयलेटसाठी अर्थसहाय्य देणाऱ्या सुभाष गुप्ता व सुशीला गुप्ता, उत्पादक सॅमटेकचे शोबित गुप्ता यांचा सत्कार करण्यात आला.विजय भंडारी म्हणाले, ‘यंदा क्लब ई-लर्निग, ई-स्वच्छता आणि ईन्व्हायरॉन्मेंटसाठी काम करत आहे. त्याअंतर्गत १०० शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड , १० ई-टॉयलेट आणि हडपसर-सातववाडी येथील ऋषी आनंदवन उद्यानाचे संवर्धन केले जाणार आहे. महापालिकेने ५० टक्के अनुदान दिल्यास अशी २० टॉयलेट आणि २०० स्मार्ट बोर्ड बसवण्याचा आमचा प्रयत्न आहे.’ पुण्याला स्मार्ट करण्यासाठी लायन्स सातत्याने योगदान देत असल्याचे रमेश शहा यांनी सांगितले.खडकी शिक्षण संस्थेच्या चेतन दत्ताजी गायकवाड येथे पहिला स्मार्ट बोर्ड बसविण्यात आला. या स्मार्ट बोर्डबरोबर अभ्यासक्रमही देण्यात आला आहे. उद्योजक कृष्णकुमार गोयल, प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते पाच स्मार्ट बोर्ड बसविण्यात आले. खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते सातववाडी येथील ऋषी आनंद उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. ------ई-टॉयलेटची वैशिष्ट्येशहरवस्तीत महिलांना स्वच्छतागृहाची होणारी अडचण लक्षात घेऊन १५ लाख रुपये किमतीची १० ई-टॉयलेट बसविण्यात येणार आहेत. हे स्वच्छतागृह अत्याधुनिक असून, प्रवेशासाठी एक रुपयाचा कॉईन टाकावा लागेल. आतमध्ये इमर्जन्सी बटन, फॅन, एक्झॉस्ट फॅन, स्वयंचलित फ्लश, कमोड साफ करण्याची यंत्रणा आहे. या टॉयलेटच्या देखभालीसाठी क्लबमार्फत एक व्यक्ती नेमला जाणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेMukta Tilakमुक्ता टिळक