शहरात अधिक दर्जेदार रस्त्यांसाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 21:10 IST2018-07-13T21:06:10+5:302018-07-13T21:10:20+5:30
शहरातील रस्त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने रस्ते संपदा व्यवस्थापन व्यवस्थेची सुरुवात केली.

शहरात अधिक दर्जेदार रस्त्यांसाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार
पुणे: शहरातील रस्त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने रस्ते संपदा व्यवस्थापन व्यवस्थेची सुरुवात केली. याद्वारे नागरी रस्ते व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी नियोजन व आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे सुकर होणार आहे.
सध्या नागरी रस्ते व्यवस्थापन करताना विविध अडचणी निर्माण होतात आणि त्यासाठी पीएमसी रस्ते संपत्ती बद्दल एका ठिकाणी वार्षिक स्तरावर माहितीची अनुपलब्धता तसेच सध्या शहरातील रस्त्यांसाठी अचूक माहिती व आकडेवारी निश्चिती शक्य होत नाही. त्याचप्रमाणे शहरांच्या रस्त्यांची वार्षिक देखभाल करणे तसेच पालिका सीमाभागातील रस्त्यांची दुर्दशा, वाया जाणारा खर्च, लांब पल्ल्यांच्या रस्त्यांच्या तुलनेत रस्ते देखभालीसाठी कमी उपलब्ध असलेला निधी आणि रस्त्यांच्या सर्वसाधारण जाळ्यांच्या देखभालीची दुरावस्था यांचा सुद्धा या अडचणींमध्ये समावेश आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप आणि पुणे महापालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख यांची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये रॅम्सबद्दलची माहिती, त्याचा परिणाम आणि उपयोगिता यावर चर्चा करण्यात आली. प्रकल्प सर्वेक्षणाचा प्राथमिक तपशील यावेळी सादर करण्यात आला.