शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत छोट्या बालकाचा 'अचाट प्रताप' ; खेळता खेळता गिळले दोन रुपयांचे नाणे..

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 14:01 IST

शाळा बंद असल्याने मुलांच्या अशा प्रतापांनी पालकांची चिंता मात्र वाढली आहे...

ठळक मुद्देडॉक्टरांनी काढले मुलाच्या अन्ननलिकेत अडकलेले नाणे

बारामती: कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासुन शाळा बंद आहेत. लहान मुले,विद्यार्थी अभ्यासापासुन मुक्त आहेत.याच काळात या मुलांना नको ते उद्योग सुचत आहेत.मात्र, या उद्योगांनी पालकांच्या जीवाला घोर लावला आहे. बारामती येथे अशाच एका बालकाने दोन रुपयांचे नाणे खेळता खेळता गिळल्याचा प्रकार घडला.पालकांसह तज्ञ डॉक्टरांनी तातडीने ते नाणे बाहेर काढल्याने अनर्थ टळला.पालकांनी याच काळात लहान मुलांकडे लक्ष देण्याची गरज बालरोग तज्ञांनी व्यक्त केली आहे.          शहरातील माजी उपनगराध्यक्ष संजय लालबिगे यांचा पुतण्या दक्ष (वय ४ वर्ष) याने मंगळवारी(दि २९) सायंकाळी मोबाईलवर  खेळता खेळता दोन रुपयांचे नाणे गिळले.त्यामुळे त्याला श्वास घेण्यास काही प्रमाणात त्रास जाणवु लागला.तसेच मळमळ वाढल्याची तक्रार त्याने पालकांकडे केली.त्याच्या पालकांनी तातडीने डॉ. राजेंद्र मुथा यांच्या रुग्णालयात बालकाला दाखल केले.यावेळी तपासणी केल्यानंतर डॉ सौरभ मुथा यांनी एक्सरे काढत नाणे नेमके कुठे अडकले आहे,याची माहिती घेतली.त्यानंतर त्यांनी तातडीने भुलतज्ञ डॉ. अमर पवार, डॉ.वैभव मदने यांना या प्रकाराची माहिती दिली.त्यानंतर या डॉक्टरांनी मिळुन दुर्बिणीच्या सहाय्याने अन्ननलिकेत अडकलेले नाणे काढले.त्यानंतर दक्षचा त्रास कमी झाला.तसेच पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

        याबाबत ‘लोकमत’शी बोलताना डॉ. सौरभ मुथा यांनी सांगितले कि, शाळा नसल्याने मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे.त्यांच्या दिनक्रमाकडे पालकांचे लक्ष असलेच पाहिजे. 

गेल्या दोन दिवसांत मुलांनी नाणे गिळल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.काही मुलांच्या नाकात शेंगदाणे,फुटाणे अडकल्याचे प्रकार घडतात.शिट्टी गिळण्याने त्रास झालेली बालके रुग्णालयात आलेली आहेत.काल दक्ष याचा श्वास कोंडत होता,त्याला उलटी होण्याचा त्रास होता.दुर्बिणीच्या सहाय्याने १५ ते २० मिनिटांत त्याच्या अन्ननलिकेत अडकलेले नाणे काढण्यास सुदैवाने यश आले.त्याला घरी सोडण्यात आले आहे.त्याची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :Baramatiबारामतीdocterडॉक्टरStudentविद्यार्थीSchoolशाळा