शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भेडणीकरांच्या घशाला उन्हाळ्याआधीच कोरड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 00:29 IST

राज्यातील सर्वांत मोठे उजनी धरण तालुक्यात असतानाही त्याच इंदापूर तालुक्यातील भेडणी गावकऱ्यांना उन्हाळ्याच्या आधीच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

काटी : राज्यातील सर्वांत मोठे उजनी धरण तालुक्यात असतानाही त्याच इंदापूर तालुक्यातील भेडणी गावकऱ्यांना उन्हाळ्याच्या आधीच पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावाचा जलस्रोत असणारी विहीर कोरडी पडल्याने भेडणीकरांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे शेजारी असलेल्या शेटफळ तलावाचे पाणी गावातील विहिरीत सोडावे, अशी मागणी सरपंच अनिल चव्हाण यांनी केली.भेडणीमध्ये सध्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना लांबपर्यंत पायपीट करावी लागत आहे. एक हंडा पाण्यासाठी गावातील पंपहाऊसवर महिलांना, तसेच नागरिकांना रांगेत उभे राहून उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत.अनेक बाया-बापड्या पंपहाऊसपासून घरापर्यंत डोक्यावर व कंबरेवर हंडा घेऊन हेलपाटे मारत आहेत, तर ज्यांचे कुटुंब मोठे आहे, त्या घरातील गडीमाणसेही इतर व्यवसाय सोडून मोटारसायकलवर ड्रम लावून पंपहाऊसला पाण्यासाठी हेलपाटे मारत आहेत.उन्हाळा संपायच्याआधीच गावातील विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे उन्हाळ््यामध्ये या गावातील पाणीटंचाई गंभीर होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे....तत्काळ उपाययोजना करणारभेडणी गावांचा पाणी सोडण्यासंदर्भात प्रस्ताव दाखल झाला आहे. शेटफळ हवेलीचे गावकामगार तलाठी यांना सध्याच्या परिस्थितीची पाहणी करून अहवाल तत्काळ कार्यालयात सादर करण्याचा आदेश दिला आहे. भेडणी गावातील नागरिकांचे हाल होऊ देणार नाहीत. त्यांच्यासाठी तत्काळ उपाययोजना करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे इंदापूर तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.उन्हाळ््यातील भीषण टंचाई लक्षात घेता त्या वेळी पाणीपुरवठा कुठून करावा, याबाबतचे नियोजन आताच करावे, शिवाय तूर्तास गावामध्ये टँकर सुरू करावा, अशी मागणी सरपंच चव्हाण यांनी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळPuneपुणे