बाह्ययंत्रणेद्वारे पद भरतीचा ‘कौशल्य’ विभागाचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:09 IST2021-06-05T04:09:20+5:302021-06-05T04:09:20+5:30
याबाबत आज मंत्री नवाब मलिक यांना निवेदन दिले आहे. ही पदभरती रद्द करून तातडीने कायमस्वरूपी पदभरती न केल्यास तीव्र ...

बाह्ययंत्रणेद्वारे पद भरतीचा ‘कौशल्य’ विभागाचा घाट
याबाबत आज मंत्री नवाब मलिक यांना निवेदन दिले आहे. ही पदभरती रद्द करून तातडीने कायमस्वरूपी पदभरती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिला आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील वर्ग-३ व वर्ग-४ ची काल्पनिक पदे निर्माण करुन सदर पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचा शासन निर्णय जारी केला आहे. या संवर्गातील ५० काल्पनिक पदे निर्माण करण्याकरीता उच्चाधिकार समिती मान्यता दिलेली आहे. ही पदभरती लाखो तरुणांचे सरकारी नोकरी स्पर्धा परीक्षा देऊन मिळवण्याचे स्वप्न उध्वस्त करणारी आहे. ही पदभरती कुठल्याही परिस्थितीत अशा बाह्य यंत्रणेद्वारे करणे हे अन्यायकारक आहे. त्यामुळे ही पदभरती रितसर शासन नियमानुसार थेट परीक्षा घेऊनच घेण्यात यावी, अशी मागणी यादव यांनी केली आहे.