सोळा वर्षे झाली कालवाही नाही अन् पाणीही!
By Admin | Updated: August 19, 2014 23:01 IST2014-08-19T23:01:40+5:302014-08-19T23:01:40+5:30
1983 मध्ये मंजुरी मिळालेल्या नीरा देवघर धरण प्रकल्पाची किंमत 61.48 कोटींवरून 1334 कोटींवर म्हणजे 15 पटीने वाढली आहे.

सोळा वर्षे झाली कालवाही नाही अन् पाणीही!
सूर्यकांत किंद्रे - भोर
1983 मध्ये मंजुरी मिळालेल्या नीरा देवघर धरण प्रकल्पाची किंमत 61.48 कोटींवरून 1334 कोटींवर म्हणजे 15 पटीने वाढली आहे. मात्र, चा:या, पोटचा:या, उपसा जलस्ंिाचन योजना, कालवे, जमीन संपादन व पुनर्वसन अशी सुमारे हजार कोटींची कामे अद्याप बाकी आहेत. धरणाच्या कामाला सुरुवात होऊन 16 वर्षे होऊनही हा प्रकल्प, तसेच धरणग्रस्तांची परवड सुरूच आहे.
नीरा देवघर धरण पूर्णपणो मातीचे आहे. फक्त मो:याच सिमेंट काँक्रीटच्या आहेत. धरणात 1क्क् टक्के म्हणजे 12 टी.एम.सी पाणी अडवले जाते. दररोज 6 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. क् ते 4क् कि.मी.र्पयतचा उजवा कालवाही पूर्ण आहे. 41 ते 75 कि.मी.र्पयतचा कालवा प्रगतिपथावर आहे.
सदरच्या कालव्यावर वेनवडी (ता. भोर), वाघेशी (खंडाळा), शेकमिरवाडी (फलटण) या उपसा जलसिंचन योजनांची कामे अपूर्ण आहेत. या कालव्यामुळे भोर 667क् हेक्टर, फलटण 12,55क् हेक्टर, खंडाळा, माळशिरस येथील 43,क्5क् हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.
वेनवडी उपसा योजनेमुळे 16 गावांतील 165क् हेक्टर जमीन भिजणार आहे; परंतु उपसा योजनेची कामे अपूर्ण आहेत. 21 कि.मी. डावा कालवा मंजूर आहे. मात्र, तो कागदावरच आहे. शिवाय, त्याचा सव्र्हे चुकीच्या पद्धतीने झाला आहे. त्याला भाटघर प्रकल्पग्रस्त परिषदेने विरोध केला आहे. त्याऐवजी नीरा देवघर धरणाजवळ बोगदा काढून म्हसर खुर्द, गोळेवाडी, करंजगाव, पिलाणोवाडी, महुडेबू, भानुसदरा, माळेवाडी, ब्राrाणघर, वरचेनांद, शिंद,
गवडी, किवत, भालावडे, बुवासाहेबवाडी, सांगवी, येवली असा करण्याची मागणी केली आहे. यामुळे 1594 हे. जमीन भिजणार आहे. मात्र, कालवा सुरू कधी होणार व पाणी कधी मिळणार हा प्रश्नच आहे. (वार्ताहर)
दोन्ही कालवे अपूर्ण असल्याने स्थानिकांना पाण्याचा उपयोग होत नाही. उन्हाळ्यात टँकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा लागतो. पुनर्वसन गावठाणात सुविधांचा अभाव व धरणकाठावर राहणा:यांना ना रोजगार, ना पाणी, ना सुखसोयी अशी अवस्था झाली आहे.
- आनंदराव सणस, सरचिटणीस (भोर वेल्हे प्रकल्पग्रस्त परिषद)
4नीरा देवघर धरणात पूर्णत: बाधित साळव, देवघर, प:हर बु., प:हर खु, हिडरेशी, दापकेघर, वेणुपुरी, माङोरी; तर पूर्णत: बुडित रायरी, गुढे, निवंगण, कुडली बु., कुडली खु., दुर्गाडी, निगुडघर, कोंढरी यांचा समावेश आहे. 19 पैकी 1क् ते 12 गावठाणांत पाणी, वीज, रस्ता, सोयी अपूर्ण आहेत. पुनर्वसन गावठाणात मूळ मालकांचा त्रस सहन करावा लागतो.
4खातेदर 1512 असून, कुटुंबातील माणसे 9729 आहेत. 3क्3 खातेदारांनी 65 टक्के रक्कम भरली आहे. 493 खातेदारांना 534.5क् हेक्टर जमीनवाटप केली आहे. अनेक शेतक:यांना 65 टक्के भरूनही जमिनीचे वाटप नाही. वर्षानुवर्षे खातेदार फक्त हेलपाटे मारत आहेत. शासनाला दर वर्षी 16क् कोटींची तरतूद केली, तरच 2क्21/22 र्पयत नीरा देवघर धरण प्रकल्प पूर्ण होईल.