शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आंजर्ले येथील समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील सहा पर्यटक बुडाले; तिघांना वाचवण्यात यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 17:10 IST

पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण पर्यटक पाण्यात बुडाले.

पुणे : पुण्यातील औंध येथून १४ पर्यटक फिरण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गेले होते. शुक्रवारी(दि. १८)  हे पर्यटक दुपारच्यास सुमारास आंजर्ले येथील समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र,पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण पर्यटक पाण्यात बुडाले.त्यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून स्थानिकांच्या मदतीने तिघांना वाचवण्यात यश आले आहे. 

 

पुण्यातील औंध येथून दापोली तालुक्यातील आंजर्लेला एका कंपनीतील 14 तरूण मुले शुक्रवारी (18 डिसेंबर) गेली होती. त्यातील सहा जण सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोहोण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडाल्याची दुर्देवी घटना घडली.  त्यातील तीन तरूणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून, स्थानिक युवकांच्या मदतीने तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. पर्यटनसाठी आलेल्या आपल्या मित्रांवर काळाने घाला घातल्याने त्यांच्या मित्रांना धक्का बसला आहे. मृत पावलेल्या तरूणांच्या कुटुंंबांवरही शोककळा पसरली आहे.

अक्षय राखलेकर (वय 25), विक्रम श्रीवास्तव (वय 24), मनोज गावंडे (वय 24) अशी मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. तर रोहित पलांडे, उबेद खान आणि निहाल चव्हाण यांना वाचविण्यात यश मिळाले आहे. त्यांच्यावर आंजर्लेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

एका कंपनीत काम करणारी 14 तरूण मुले शुक्रवारी ( 18 डिसेंबर) पर्यटनासाठी आंजर्ले (ता.दापोली) येथे गेली होती. त्यातील सहा तरूणांना समुद्रामध्ये जाण्याचा मोह झाला आणि ते समुद्रात उतरले. मात्र पोहताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. ते बुडायला लागले. तिथल्या एका छोट्या  मुलाने ते पाहिले आणि त्याने धावत जाऊन स्थानिक युवकांना माहिती दिली. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती समजताच दापोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक युवकांनी मोठ्या शर्थीने या सहा तरूणांना बाहेर काढले. पण दुर्देवाने त्यातील तीन तरूण हे बुडाले.--------------------------------------------------------------------------------

टॅग्स :Dapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणेDeathमृत्यूtourismपर्यटनRatnagiriरत्नागिरीAundhऔंध