शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या सोनवणे रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह सहा नर्स 'क्वारंटाईन '

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 13:05 IST

गरोदर महिला निघाली कोरोना संक्रमित..

ठळक मुद्देशहरातील माध्यवस्तीसह आणखी २२ ठिकाणे सील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ३० पेक्षा अधिकताप असल्याने घेतले होते घशातील द्रावाचे नमुने 

पुणे : महापालिकेच्या सोनवणे प्रसूतिगृहामध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या गरोदर महिलेला कोरोना संक्रमण झाल्याचे समोर आल्यानंतर तिच्यावर उपचार करणाऱ्या दोन डॉक्टरसह पाच ते सहा नर्सना विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. रुग्णालयात खबरदारी बाळगण्यात येत आहे. शहरात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत चालली आहे. आतापर्यत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ३० पेक्षा अधिक झाला आहे. पालिकेकडून सर्वेक्षण, तपासण्या, विलगिकरण, जनजागृती, प्रत्यक्ष उपचार आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील माध्यवस्तीसह आणखी २२ ठिकाणे सील करण्यात आली आहेत. कोरोनाचा सामाजिक संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोनवणे रुग्णालयात दाखल झालेली महिला गरोदर होती. तिला ताप आणि अशक्तपणा असल्याने डॉक्टरांनी तिच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले होते. या तपासणीचा वैद्यकीय अहवाल सोमवारी पिझिटिव्ह आला. या महिलेला कोरोना संक्रमण झाल्याचे निष्पन्न होताच उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे सोनवणे रुग्णालयात खळबळ उडाली आहे. या महिलेवर उपचार करीत असलेल्या दोन डॉक्टर आणि सहा नर्सचे विलगिकरण करण्यात आले आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयातील एक नर्स कोरोना संक्रमित झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता पालिकेच्या सोनवणे रुग्णालयात दाखल झालेल्या एका महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांना खबरदारी घेण्याच्या आणि आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विलगिकरण करण्यात आलेल्या वैद्यकीय कर्मचा?याव्यतिरिक्त अन्य कर्मचार्यांनावरही लक्ष ठेवण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल