शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहर भाजपाने मागितल्या मुख्यमंत्र्यांच्या सहा सभा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 12:47 IST

मोदी, शहा, मुख्यमंत्री यांच्या सभांसाठी मोठे मैदान लागणार आहे. त्यानुसार काही संस्थांबरोबर बोलणी सुरू आहेत

ठळक मुद्देपुणे शहर भाजपाने मागितल्या मुख्यमंत्र्यांच्या सहा सभा 

पुणे: उमेदवार जाहीर केला गेला नसला तर भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर शाखेने प्रचाराचे नियोजन मात्र जोरात सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहा सभांची मागणी राज्य शाखेकडे करण्यात आली असून केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांच्याही सभा मिळाव्यात असे कळवण्यात आले आहे. त्याशिवाय चौक सभा, कोपरा सभा, रोड शो यांचेही नियोजन सुरू आहे.शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ही माहिती दिली. पक्षाच्या केंद्रीय व राज्य शाखेने प्रचाराचे नियोजन करण्याबाबत कळवले असून त्यानुसार बैठका घेऊन तसेच विविध समित्यांची स्थापना करून काम सुरू आहे असे ते म्हणाले.

पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार संघांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा व्हाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांच्याही सभा मागण्यात आल्या आहेत. सभांसाठी जागा शिल्लक नसल्यामुळे त्याचेही नियोजन सुरू आहे. मोदी, शहा, मुख्यमंत्री यांच्या सभांसाठी मोठे मैदान लागणार आहे. त्यानुसार काही संस्थांबरोबर बोलणी सुरू आहेत अशी माहिती गोगावले यांनी दिली.भाजपाच्या शैलीप्रमाणे चौक सभा, कोपरा सभा यावर भर देण्यात येईल. त्याचेही नियोजन बूथ केंद्र प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख तसेच नगरसेवकांच्या सहकायार्ने सुरू आहे. त्यासाठी स्थानिक तसेच राज्यस्तरावरील काही वक्ते असतील. अशा २२ वक्त्यांची यादीच तयार करण्यात आली आहे. त्यांना त्याबाबत कळवण्यात आले असून त्यांच्या तारखांच्या नियोजनानुसार सभांचे आयोजन केले जाईल. रोड शो साठी पक्षाचे स्टार प्रचारक आणले जाणार आहेत. त्याचेही नियोजन सुरू आहे असे गोगावले म्हणाले. .............जागा भाजपाकडे असली तरी युती करून ती आम्ही लढत आहोत, त्यामुळे आमच्या प्रत्येक नियोजनात शिवसेना व आमचे मित्रपक्ष आहेतच. संयुक्त मेळावा रद्द झाला, आता प्रचाराची गडबड असल्यामुळे तो होईल असे वाटत नाही, मात्र २४ मार्चला कोल्हापूरला प्रचाराचा एकत्रित नारळ वाढवण्यात येणार आहे. तशीच प्रचाराची एक संयुक्त सभा पुण्यातही व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे गोगावले यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस