शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड रस्त्यावरील चालकाचा सहा लाखांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 20:43 IST

सिंहगडरोडवरील नांदेडसिटी येथे एका सतरा वर्षांच्या तरूणाने सातारा येथील नातेवाईकाला देण्यासाठी दिलेली सहा लाखांची रक्कम घेऊन कार चालक भामटा पसार झाला.

ठळक मुद्देनांदेडसिटीतील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून अवघ्या दहा तासांत आरोपी ताब्यात

पुणे : सिंहगडरोडवरील नांदेडसिटी येथे एका सतरा वर्षांच्या तरूणाने सातारा येथील नातेवाईकाला देण्यासाठी दिलेली सहा लाखांची रक्कम घेऊन कार चालक भामटा पसार झाला. पसार झालेल्या या भामट्याकडून हवेली पोलिसांनी तत्परतेने अवघ्या दहा तासांत सर्व रक्कम ताब्यात घेत अजय गोडसे (रा.नांदेडसिटी) यांना परत दिली. त्यावेळी गोडसे पती पत्नी आणि मुलाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले.माधव तुकाराम मोरे ( वय ,३१ ,मुळ रा. लातूर, सध्या रा. बिबवेवाडी ,पुणे ) असे भामट्याचे नाव आहे. तो खाजगी कार चालक असून प्रवासी वाहतूक करण्यासाठी नांदेडसिटी येथे आला होता. त्यावेळी नांदेडसिटी येथील मंगलभैरव बिल्डींग मध्ये राहणाऱ्या  चैतन्य अजय गोडसे (वय १७) यास त्याच्या आईने वडूज (सातारा) येथील नातेवाईकास देण्यासाठी सहा लाख रुपयांची रक्कम घेऊन बिल्डींगच्या गेटवर आलेल्या एका कार चालकाजवळ देण्यासाठी पाठविले. त्यावेळी गेटवर भामटा माधव मोरे कार घेऊन उभा होता. चैतन्याने मोरे याला हात दाखवून इशारा केला. त्यावेळी मोरे यानेही त्याला हात दाखवून इशारा केला. त्यामुळे चैतन्य यास वाटले हात दाखवत असलेल्या कार चालकाजवळ रक्कम देण्यास सांगितले आहे. असे समजून चैतन्य याने सहा लाख रुपये भामटा माधव मोरे याला दिली.नंतर चैतन्य याने मोरे याला मोबाईलवर वडिलांना फोन लावून दिला. त्यावेळी मोरे याचा आवाज ऐकून वडिलांना संशय आला. त्यांनी चैतन्य यासकडे मोबाईल देण्यास सांगितले.मात्र मोरे याने फोन बंद केला. मोरे सर्व रक्कम घेऊन कारसह लगबगीने पसार झाला. त्यानंतर खरा कार चालक गेटवर आला. त्यावेळी भामट्याने सहा लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केल्याचे गोडसे यांना समजले. हा प्रकार दुपारी दीड वाजता घडला. याची तक्रार गोडसे यांनी हवेली पोलीस ठाण्यात रात्री आठ वाजता दाखल केली. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी मोठ्या रक्कमेच्या चोरीचे गांभीर्य पाहून तातडीने तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक आर.के. वाईकर, हवालदार शेंडगे, वानोळे यांच्या पथकासह मंगलभैरव बिल्डींग तसेच नांदेडसिटीतील रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून भामटा माधव मोरे याला दुसरया दिवशी सकाळी अवघ्या दहा तासांत ताब्यात घेतले. तो रक्कम घेऊन पोबारा करण्याआधीच हवेली पोलीसांनी त्याच्याकडून सर्व सहा लाख रुपयांची रक्कम वसूल केली.आणि ती गोडसे यांना परत दिली. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक