पुणे- नगर रस्त्यावर भीषण अपघातात सहा ठार

By Admin | Updated: July 3, 2017 04:47 IST2017-07-03T04:47:37+5:302017-07-03T04:47:37+5:30

मिनी बस आणि पाण्याच्या टँकरमध्ये झालेल्या भीषण टकरीत पुण्यातील सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ तरुण जखमी

Six killed in a horrific accident on the Pune-city road | पुणे- नगर रस्त्यावर भीषण अपघातात सहा ठार

पुणे- नगर रस्त्यावर भीषण अपघातात सहा ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मिनी बस आणि पाण्याच्या टँकरमध्ये झालेल्या भीषण टकरीत पुण्यातील सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ तरुण जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे- नगर रस्त्यावर रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. अपघातातील सर्व तरुण हिंजवडी येथील कारखान्यात काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केले. या विचित्र अपघातात पाठीमागून येत असलेल्या आणखी दोन मोटारी दुसऱ्या वाहनांनाही धडकल्या. त्यामधील प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत.
वैभव माने (२७, रा. म्हाळुंगे, बाणेर), महेश वसंत पवार (२८, रा. सासवड, ता. पुरंदर), नुपुर साहू
(२६, रा. वनाज कॉर्नर, कोथरुड), निखील जाधव (२६, रा. भोसरी), अक्षय धबाडे (२८, रा, सांगवी), विशाल चव्हाण (२९, विमाननगर) अशी मृतांची नावे आहेत.

Web Title: Six killed in a horrific accident on the Pune-city road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.