अजिंक्यपद स्पर्धेत सहा भारतीय खेळाडूंचा मुख्य फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:11 AM2021-03-09T04:11:20+5:302021-03-09T04:11:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्यातर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित ...

Six Indian players advance to the main draw of the championship | अजिंक्यपद स्पर्धेत सहा भारतीय खेळाडूंचा मुख्य फेरीत प्रवेश

अजिंक्यपद स्पर्धेत सहा भारतीय खेळाडूंचा मुख्य फेरीत प्रवेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्यातर्फे आणि पीएमडीटीएच्या संलग्नतेने आयोजित २५ हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत सोहा सादिक, निधी चिलूमुला, आरती मुनियन, अलीन कोमर फरहात, श्राव्या चिलकलापुडी, श्रेया तातावर्ती या सहा भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत पात्रता फेरीच्या अंतिम चरणात तिसऱ्या मानांकित सोहा सादिक हिने सातव्या मानांकित प्रत्युशा रचापुडीचा असा सरळ सेटमध्ये पराभव केला. नवव्या मानांकित आरती मुनियन व पाचव्या मानांकित निधी चिलूमुला यांनी अनुक्रमे यशिका वेणू व सोनाशी भटनागर यांचा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.

आठव्या मानांकित श्रेया तातावर्ती हिने काल मानांकित खेळाडूंवर विजय मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या तेजस्वी काटेचा पराभव करून आगेकूच केली. अलीन कोमर फरहात हिने राधिका यादवचा तर, दुसऱ्या मानांकित श्राव्या शिवानी चिलकलापुडी हिने रेनी सिंगलाचा पराभव करून मुख्य फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : अंतिम पात्रता फेरी : महिला :

सोहा सादिक (भारत) [३] वि.वि. प्रत्युशा रचापुडी (भारत)[७] ६-३, ६-२;

अलीन कोमर फरहात (भारत) वि.वि. राधिका यादव (भारत) ६-१, ६-०;

श्राव्या शिवानी चिलकलापुडी (भारत) [२] वि.वि. रेनी सिंगला (भारत) ६-१, ६-३;

आरती मुनियन(भारत)[९] वि.वि. यशिका वेणू (भारत) ६-१, ६-१;

श्रेया तातावर्ती (भारत) [८] वि.वि. तेजस्वी काटे (भारत) ६-३, ६-१;

निधी चिलूमुला(भारत) [५] वि.वि. सोनाशी भटनागर(भारत) [१०] ६-१, ६-१.

Web Title: Six Indian players advance to the main draw of the championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.