भोरगिरीच्या उपसरपंचपदी सीता वनघरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:12 IST2021-03-01T04:12:23+5:302021-03-01T04:12:23+5:30

निवडणुकीत दत्तात्रय हिले सातपैकी पाच मते मिळवत विजयी झाले. त्यांच्याविरोधात दत्ता वनघरे यांनी अर्ज भरला होता त्यांना फक्त ...

Sita Vanghare as Deputy Panch of Bhorgiri | भोरगिरीच्या उपसरपंचपदी सीता वनघरे

भोरगिरीच्या उपसरपंचपदी सीता वनघरे

निवडणुकीत दत्तात्रय हिले सातपैकी पाच मते मिळवत विजयी झाले. त्यांच्याविरोधात दत्ता वनघरे यांनी अर्ज भरला होता त्यांना फक्त दोन मते मिळाली. उपसरपंच सीता वनघरे या दिलीप सोनवणे यांच्या विरोधात पाच मते मिळवत विजयी झाल्या.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी सोमनाथ कारंडे व ग्रामसेवक गणेश आंबेकर यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा ग्रामस्थांनी सन्मान केला. यावेळी सदस्य सुनिता काठे, माधुरी काठे, कुंजना शेंगाळे उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपसभापती विठ्ठल वनघरे, चंद्रकांत कौदरे, दत्ता कौदरे, महिपत सुपे, सुरेश काठे, भागू काठे,,अंकुश काठे, संजय काठे, विश्वनाथ गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.

भोरगीरीयेथील नवनिर्वाचित पदाधिकारी, उपसभापती विठ्ठल वनघरे व ग्रामस्थ.

Web Title: Sita Vanghare as Deputy Panch of Bhorgiri