शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअर मावस भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार; धावत्या रेल्वेतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 16:13 IST

नराधम तरुणाला दहा वर्षे सक्तमजुरी

पुणे: धावत्या रेल्वेत बहिणीवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मावस भावाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आठ वर्षांपूर्वी हरिद्वार ते पुणे धावणाऱ्या संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये हा भयंकर गुन्हा घडला. यात नराधमाला शिक्षा झाली आहे.

सत्र न्यायाधीश एस. एस. गुल्हाणे यांनी हा निकाल दिला. यात ३२ वर्षीय आरोपी 'मर्चंट नेव्ही मधील इंजिनीअर असून, त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (२) (एफ) नुसार बलात्कार आणि कलम ३०७ नुसार खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरविले. याबाबत पीडितेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. हा प्रकार १४ जुलै २०१५ रोजी संपर्क क्रांती एक्स्प्रेसमध्ये आणि दुसऱ्या दिवशी पुण्यात पीडितेच्या मावशीच्या घरी घडला.

घटनेच्या दिवशी पीडित मुलगी, तिची मावशी आणि मावस भाऊ रेल्वेने पुण्यात येत होते. भोपाळ रेल्वे स्थानक येण्यापूर्वी पीडित मुलगी रेल्वेतील स्वच्छतागृहात गेली. तेथून बाहेर येत असताना आरोपीने तिला पुन्हा स्वच्छतागृहात ढकलून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

घाबरलेल्या पीडितेने पुण्यात आल्यावर घडलेला प्रकार तिच्या मावशीला आणि मैत्रिणीला सांगितला. दुसऱ्या दिवशी पीडितेच्या मैत्रिणी तिच्या मावशीच्या घरी आल्या. त्यावेळी पीडिता त्यांना रेल्वेत घडलेली घटना सांगत असताना मावस भाऊ तेथे आला. त्याने पीडितेला जमिनीवर ढकलून तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मावशीने आणि पीडितेच्या मैत्रिणीने तिला सोडविण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांना मारहाण केली आणि घरातून पोबारा केला. या प्रकरणात आरोपीवर भोसरी एमआयडीसी आणि भोपाळ रेल्वे पोलीस ठाण्यात बलात्कार, खुनाचा प्रयत्न, धमकावणे यांसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि सहायक पोलीस फौजदार नारायण पवार यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.

मावशी आणि मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे अकरा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची मावशी आणि मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने मावस बहिणीवर बलात्कार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून, त्याला अधिकाधिक कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी, असा युक्तिवाद सप्रे यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेSexual abuseलैंगिक शोषणWomenमहिलाCourtन्यायालय