शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात खेळणार नाही...! पाकिस्तानने वर्ल्डकपमधून नाव काढून घेतले; आशिया कपचे दिले कारण...  
2
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
3
सामाजिक कार्यकर्त्याची पत्नीकडूनच हत्या; रात्री २.३० च्या सुमारास..., चिंचवड हादरले
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा; म्हणाले, 'सहा महिन्यांत परिणाम कळेल!'
5
बदलणार पेमेंटची पद्धत! म्युच्युअल फंडमधून थेट UPI पेमेंट करा; काय आहे ‘Pay with Mutual Fund’ फीचर?
6
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
7
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
8
प्रसिद्ध गायक सचिनला अटक! लग्नाचं आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप
9
KVP Investment Scheme: पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
10
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
11
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
12
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
13
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
14
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
15
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
16
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
17
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
18
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
19
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
20
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर

" साहेब आता किती बी पाऊस पडू द्या, घाबरत नाही ;कारण नुकसान होण्याजोगे काही उरलंच नाही..!" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 21:49 IST

विलास कुंजीर यांच्या मालकीच्या चौदा एकरामधील ऊस, कांदा, बाजरी, मका, भुईमूग अशी विविध पिके रविवारी झालेल्या पावसामुळे वाहुन गेली आहेत.. .  

ठळक मुद्देजिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पावसाने नुकसान झालेल्या भागाची केली पाहणी

सुनील जगताप -

उरुळी कांचन : वळती , शिंदवणे, तरडे व उरुळी कांचन या गावातील नागरिक व व्यावसायिक यांच्यासह कालच्या ढगफुटीचा सगळ्यात जास्त फटका बसला तो बळीराजाला.. त्याच धर्तीवर पावसामुळे नुकसान झालेल्या परिसराची पाहणी करण्यासाठी आलेल्या जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना माहिती देताना साठ वर्षीय शेतकरी विलास रामचंद्र कुंजीर म्हणाले, '' साहेब आता किती बी पाऊस पडू द्या, अजिबात घाबरत नाही.. कारण या पावसाने नुकसान होण्याजोगे काही शिल्लक ठेवलेच नाही तर घाबरु कशाला?..'' या साठ वर्षीय शेतकऱ्याच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू आणि हा काळजाचा ठाव घेणाऱ्या संवादाने उपस्थित असलेले सारेच जण काहीवेळ गहिवरले.  

विलास कुंजीर यांच्या मालकीच्या चौदा एकरामधील ऊस, कांदा, बाजरी, मका, भुईमूग अशी विविध पिके रविवारी झालेल्या पावसामुळे वाहुन गेली आहेत.  दोन विहिरी मातीने व दगड धोंड्यामुळे बुजल्या आहेत.                  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सोमवारी ( दि. १९) वळती, शिंदवणे, तरडे व उरुळी कांचन या पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी ढगफुटीने झालेल्या सर्वप्रकारच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे महसूल, कृषी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण विभाग, इरिगेशन विभागांच्या समन्वयातून करून ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सात दिवसाच्या आत पाठवावेत असे आदेश देशमुख यांनी दिले.यावेळी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यासह उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर,तहसीलदार सुनील कोळी, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, मंडल अधिकारी दीपक चव्हाण, प्रशासक निकेतन धापटे आदी उपस्थित होते.  

                 देशमुख म्हणाले,  उरुळी कांचनसह पूर्व हवेलीमधील सर्वच ओढ्या - नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले आहे. हे अतिक्रमणे कायमस्वरुपी हटण्यासाठी हवेलीमधील लोकप्रतिनिधी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच बोलविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख सांगितले.               यावेळी आमदार अशोक पवार म्हणाले, वळती हद्दीतील घाटमाथ्यावर रविवारी (ता.१८) सायंकाळी पाचच्या सुमारास ढगफुटी पाऊस झाल्याने, वळती परीसरातील हजारो एकर क्षेत्रावरील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील फळबागा, कांदा, तरकारी, भुईमूग, चारा पिके याचे अतोनात नुकसान झाले आहे. वळती ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. आमदार या नात्याने वळती येथील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही आमदार पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनRainपाऊसFarmerशेतकरीcollectorजिल्हाधिकारी