वाहनचोरास सिंहगड पोलिसांनी केली अटक, चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:57 IST2018-01-06T13:50:16+5:302018-01-06T13:57:14+5:30
सिंहगड पोलिसांनी वाहनचोरास अटक केली असून त्याच्याकडून ५ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

वाहनचोरास सिंहगड पोलिसांनी केली अटक, चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत
पुणे : सिंहगड पोलिसांनी वाहनचोरास अटक केली असून त्याच्याकडून ५ चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
वाहनचोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी सिंहगड तपास पथकातील अधिकारी तसेच कर्मचारी गस्तीवर असताना दुचाकीवरुन वेगाने जाणाऱ्या संशयित इसमास ताब्यात घेतले. नागनाथ विठ्ठल पाटील (वय १९, रा. हनुमान नगर, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. सखोल चौकशी केली असता सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीतून एकूण ५ दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली आहे. आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई परिमंडळ २चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे, स्वारगेटचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीष सोनवणे, पोलीस कर्मचारी यशवंत ओंबासे, दयानंद तेलंगे पाटील, दत्ता सोनवणे, राहुल शेडगे, सचिम माळवे, पांडुरंग वांजळे, श्रीकांत दगडे, मयूर शिंदे, वामन जाधव, भीमराज गांगुर्डे यांच्या पथकाने केली.