पुणेकरांचा विकेंड होणार हॅप्पी : सिंहगड वाहतुकीसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 21:44 IST2018-08-02T21:42:57+5:302018-08-02T21:44:46+5:30
पुणेकरांचा येणारा वीकएंड आनंददायी ठरणार असून दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेला सिंहगड रस्ता सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार-रविवार सिंहगड सिंहगड पर्यटनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

पुणेकरांचा विकेंड होणार हॅप्पी : सिंहगड वाहतुकीसाठी खुला
पुणे : पुणेकरांचा येणारा वीकएंड आनंददायी ठरणार असून दरड कोसळल्यामुळे बंद करण्यात आलेला सिंहगड रस्ता सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार-रविवार सिंहगड सिंहगड पर्यटनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जुलै महिन्यात सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे सिंहगड घाट रस्त्यातील उंबरदंड दरड पाॅईंटवर एक आठवड्यात दोनवेळा मोठी दरड कोसळली होती. सुदैवाने दोनही वेळेस ही घटना पहाटे घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
सिंहगडावरील वाहन तळापासून खाली एक किलोमीटर अंतरावर कोसळलेल्या दरडेमुळे दगड, गोटे व राडारोड्यामुळे संपुर्ण रस्ता व्यापला होता. या काळात रस्ता बंद करून ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरु होते.अखेर गुरुवारी हे काम पूर्ण झाल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले.सहाय्यक वन संरक्षक महेश भावसार म्हणाले की, पर्यटकांना मार्गदर्शनकरण्यासाठी घाटरस्त्यावरील धोकायदायक ठिकाणी वनसंरक्षण समितीचे कर्मचारी तैनात करण्यात येतील. पर्यटकांची सुरक्षितता विचारात घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.