खेड घाटातून एकेरी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:14 IST2021-08-28T04:14:35+5:302021-08-28T04:14:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : पुणे-नाशिक रस्त्यावरील नवीन खेड घाटाचे शिवसेना व राष्ट्रवादीने श्रेय घेण्यासाठी मोठ्या दिमाखात उद्घाटन करून ...

खेड घाटातून एकेरी वाहतूक
लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : पुणे-नाशिक रस्त्यावरील नवीन खेड घाटाचे शिवसेना व राष्ट्रवादीने श्रेय घेण्यासाठी मोठ्या दिमाखात उद्घाटन करून खेड घाटातील बाह्यवळण रस्ता खुला केला होता. मात्र, रस्त्याच्या एका बाजूच्या दरडी धोकादायक असल्यामुळे एका बाजूचा रस्ता बंद आहे. या धोकादायक दरडी काढून तत्काळ रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्यापासून खेड घाटातील धोकादायक दरडी अस्तरीकरणांचे काम सुरू आहे. त्यामुळे मंचर बाजूकडे जाणारा रस्ता बंद आहे. त्यामुळे जुन्या घाटांतून वाहतूक सुरू आहे. पावसामुळे दरडी थेट दरडी रस्त्यावर पडत होत. सध्या धोकादायक दरडी काढण्याचे काम बंद आहे. रेंगाळलेली ही कामे पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. खेड जुन्या घाटात वाहतूककोंडी, अपघात नित्याचेच झाले आहेत. नवीन घाटाचे अनेक वर्षे काम बंद होते. त्यानंतर घाटाचे काम होऊन एक लेन सुरू झाली. दुसऱ्या लेनचे काम धोकादायक दरडी कोसळत असल्याने तसेच अस्तरीकरण पूर्ण न करता निम्मेच करण्यात आले. घाटात वाहनचालकांसाठी सूचनाफलक नाहीत. एवढे अपूर्ण कामे असतानाही राष्ट्रवादी आणि शिवसेनेने नवीन घाटाचे उद्घाटन श्रेय घेण्यासाठी केले. श्रेय घेऊन झाले असेल तर नवीन घाटातील दुसरी लेन तसेच राहिलेली कामे तत्काळ पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
फोटो ओळ : खेड नवीन घाटातील धोकादायक दरडी काढण्याचे बंद आहे. दरडी कोसळून मुरुम, दगडी रस्त्यांवर येत आहे. त्यामुळे रस्त्यांची एका बाजूची वाहतूक बंद आहे.