भगवान महावीरांची साध्या पद्धतीने पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:09 IST2021-04-26T04:09:17+5:302021-04-26T04:09:17+5:30

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे सुपार्श्वनाथ जैन मंदिर ट्रस्टने लोकवर्गणीतून जैन मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर येथील जैन बांधवांना सलग दुसऱ्या ...

Simple worship of Lord Mahavira | भगवान महावीरांची साध्या पद्धतीने पूजा

भगवान महावीरांची साध्या पद्धतीने पूजा

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे सुपार्श्वनाथ जैन मंदिर ट्रस्टने लोकवर्गणीतून जैन मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर येथील जैन बांधवांना सलग दुसऱ्या वर्षीही महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करता आली नाही. यावर्षी मुख्य बाजारपेठेतून भगवान महावीरांच्या मूर्तीची चांदीच्या पालखीतून काढण्यात येणारी मिरवणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे सुपार्श्वनाथ जैन मंदिर ट्रस्टने रद्द केली. कोरोनाचे सावट असल्यामुळे जैन मंदिरात भगवान महावीर मूर्तीची साध्या पद्धतीने पूजा करून जैन बंधूंनी महावीर जयंती साजरी केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुदीप गुंदेचा, महेंद्र शहा, नितीन गुंदेचा, अजित पोखर्णा, कमलेश पोखर्णा, प्रफुल्ल गुंदेचा, पुजारी रमेश परमार उपस्थित होते.

२५ तळेगाव ढमढेरे

सुपार्श्वनाथ जैन मंदिरात भगवान महावीरांच्या मूर्तीचे दर्शन घेताना जैन बांधव.

Web Title: Simple worship of Lord Mahavira