शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

समान पाणी योजनेतून राष्ट्रवादीचे घूमजाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 7:47 AM

समान पाणी योजनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धरसोड भूमिकेची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधातील भाजपाला बरोबर घेत या योजनेला मंजुरी दिली

पुणे : समान पाणी योजनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धरसोड भूमिकेची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधातील भाजपाला बरोबर घेत या योजनेला मंजुरी दिली, मात्र आता सत्ता गेल्यानंतर विरोध केला जात आहे. संधिसाधू अशा शब्दांत भाजपा व अन्य पक्षांकडून राष्ट्रवादीच्या या कृतीचे वर्णन केले जात आहे.राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातच या योजनेला मंजुरी देण्यात आली. काँग्रेसने त्या वेळी सत्तेतील घटक असूनही काही मुद्द्यांवर विरोध केला होता. तो डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने त्या वेळी विरोधात असलेल्या भाजपाचे साह्य घेतले व बहुमताने ही योजना मंजूर केली. त्याच वेळी योजनेसाठी कर्जरोखे काढले जाणार आहेत, केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळणे शक्य नाही, रस्ते खोदले जाणार आहेत, टाक्यांच्या कामाच्या निविदेत काही शंकास्पद प्रकार घडले आहेत, एकाच कंपनीला प्राधान्य दिले जात आहे. हे सर्व प्रकार उघडपणे बोलले जात होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत राष्ट्रवादी काँग्रेसने योजना मंजूर केली.आता मात्र नेमक्या याच मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने योजनेला विरोध सुरू केला आहे. या योजनेत शहरातंर्गत सर्व जलवाहिन्या बदलल्या जाणार आहेत. त्या कामाची १ हजार ८०० कोटी रुपयांचीनिविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. कर्जरोख्यांबाबतही राष्ट्रवादीने शंका निर्माण केली आहे. योजनेला मंजुरी देण्यात आली, त्या प्रस्तावातच या सर्व गोष्टींचा उल्लेख होता. तरीही त्यांनी त्या वेळी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातुलनेत काँग्रेस पक्षाचा विरोध मात्र कायम मुद्देसूद व टोकाचा राहिला आहे. त्यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरुवातीचा पाठिंबा व आताचा विरोध हा महापालिका वर्तुळात जास्त चर्चेचा विषय झाला आहे.व्याजाचाभुर्दंड थेट पुणेकरांवर१ या योजनेला बहुसंख्य वरिष्ठ अधिकाºयांचा विरोध आहे. त्यांच्यामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या धरसोडपणाची चर्चा आहे. आवश्यकता नसताना केवळ केंद्र व राज्यातील काही वरिष्ठ राजकारण्यांच्या आग्रहातून ही योजना पुणेकरांवर लादण्यात आली, असे अधिकाºयांचे मतआहे. २ राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळातच टोकाचा विरोध केला असता तर आता ही वेळ आलीच नसती, असे त्यांच्यातील काहींनी खासगीत बोलताना सांगितले. आता तर फक्त २०० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे, कामाला सुरुवात झाल्यानंतर ठेकेदार कंपनीची बिले अदा करण्यासाठी आणखी कर्ज काढले जाईल व त्याच्या व्याजाचा भुर्दंड महापालिकेवर, पर्यायाने पुणेकरांवर बसेल असे या अधिकाºयांचे मत आहे.३ भाजपाने आयोजित केलेल्या टाक्यांच्या कामाच्या उद््घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसने घातलेल्या वादामुळे भाजपातही राष्ट्रवादीच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झालाच असेल तर तो त्यांच्या सत्ताकाळात झाला आहे. ४ आम्ही कामाचे व्यवस्थित नियोजन केले, त्यासाठीचे कार्यक्रम आयोजित केले तर त्यांनी आंदोलन करण्याचे कारण नव्हते, मात्र त्यांनी त्या वेळी मनात जे ठेवले होते, ते आता आमच्या सत्ताकाळात होत नसल्यानेच त्यांचा राग आहे व विरोध त्यामुळे होत आहे असे भाजपाच्या काही नेत्यांनी सांगितले.