शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात मेट्रो लवकरच सुरु होण्याची चिन्हे; वनाज ते आयडियल मार्गावर झाली तांत्रिक चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 12:47 IST

परिसरातील नागरिकांनी रात्री अचानक मेट्रो मार्गावर मेट्रो अवतरल्याचा आनंद घेतला

ठळक मुद्दे१६ ऑगस्ट २०२१ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा मार्ग लोकार्पण करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे

पुणे: वनाज ते आयडियल कॉलनी या ८०० मीटरच्या मार्गावर गुरूवारी रात्री ११ वाजता मेट्रोची तांत्रिक चाचणी घेण्यात आली. ही चाचणी प्रकल्पातंर्गत होती. तांत्रिक काम करणाऱ्या अभियंत्यांनीच ती घेतली. त्यामुळे मेट्रोच्याही कोणा वरिष्ठांना वगैरे त्यासाठी बोलावण्यात आलेले नव्हते, तसेच चाचणी घेणार आहोत असेही जाहीर करण्यात आले नव्हते. असे मेट्रोचे जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.

दरम्यान या परिसरातील नागरिकांनी मात्र रात्री अचानक मेट्रो मार्गावर मेट्रो अवतरल्याचा आनंद घेतला. काहींनी लगेच त्याचा व्हिडीओ व्हायरल केला. अतीशय कमी वेगात चालणारी ही मेट्रो रस्त्यावर थांबून अनेकांनी पाहिली. पाऊस नव्हता आणि काही कामे व्यवस्थित झाली आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी म्हणून. ही चाचणी घेतल्याचे मेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितले. ३ कोच लावून ही चाचणी झाली. मेट्रोचे दिवे लावण्यात आले होते. रात्रीच्या अंधारात रस्त्यावरील खांबांवरून चालणारी मेट्रो मनोहारी दिसत होती असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

https://twitter.com/MiLOKMAT/status/1413374753016999938?ref_src=twsrc%5Etfw

वनाज ते गरवारे महाविद्यालया हा साधारण ५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग प्राधान्य मार्ग म्हणून महामेट्रोने जाहीर केला आहे. त्यावरील आयडीयल कॉलनी व गरवारे महाविद्यालय या स्थानकांचे बांधकाम जवळपास पुर्ण झाले आहे. एस एनडीटी महाविद्यालय व अन्य दोन. स्थानकांचे कामही गतीने करण्यात येत आहे. मेट्रो मार्ग तर पुर्ण झाला आहे. पिंपरी चिंचवड ते दापोडी या दुसर्या प्राधान्यमार्गाचे काम पुर्ण झाले आहे. १६ ऑगस्ट २०२१ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा मार्ग लोकार्पण करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. त्याचवेळी या वनाज ते गरवारे मार्गाची चाचणी व्हावी यासाठी महामेट्रोची धडपड सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोrailwayरेल्वेGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका