शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पिंपरी - चिंचवड शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने कंटेन्मेंट झोनमध्ये लक्षणीय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 15:17 IST

सक्रिय रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात

ठळक मुद्देगृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांकडे लक्ष ठेवणे, हे पालिकेसमोरील आव्हान

पिंपरी: फेब्रुवारीपासून शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटयाने वाढ होत आहे. महापालिकेने तयार केलेल्या मेजर आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन मध्ये सद्यस्थितीत ८७९ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. तर २१५ मेजर कंटेन्मेंट झोन आहेत. दोन्ही कंटेन्मेंट झोन मध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे महापालिकेची चिंता वाढणार असल्याचे दिसून येत आहे.  संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट झोन तयार केले जात आहेत. महापालिकेने शहरात मायक्रो आणि मेजर कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले. शहरात सध्या ११ हजार ९२२ सक्रिय रुग्ण आहेत. दररोज १ हजार ५०० च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. परंतु सक्रिय रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या झोनची विभागणी केली आहे. त्यामुळे दोन्ही कंटेन्मेंट झोनची वाढही झपाटयाने होत आहे. कंटेन्मेंट झोनने आता एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दर दिवसाला दोन्ही कंटेन्मेंट झोनमध्ये चढ - उतार होताना दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. बऱ्यापैकी रुग्णांना घरी राहण्याचा सल्ला महापालिकेकडून दिला जात आहे. कंटेन्मेंट झोन मध्ये वाढ झाली आहे. पण त्यामुळे महापालिकेची चिंता वाढणार आहे. कारण गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांकडे लक्ष ठेवणे, हे पालिकेसमोरील आव्हान असणार आहे. 

मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणजे काय ? 

सोसायटीमधील एखाद्या घरात एक किंवा दोन रुग्ण आढळले. तर सोसायटी पूर्ण सील न करता रुग्ण राहणारा मजला सील केला जातो.

मेजर कंटेन्मेंट झोन म्हणजे काय ? 

एखाद्या सोसायटीत आठ पेक्षा जास्त रुग्ण आढळले. तर ती सोसायटी सील करून त्याला मेजर कंटेन्मेंट झोन म्हणून सील केले जाते. 

दहा मार्च नंतर वाढलेले कंटेन्मेंट झोन 

१० मार्च: मेजर १६९, मायक्रो ६०२११ मार्च: मेजर १२०, मायक्रो ६६३१२ मार्च: मेजर १३२, मायक्रो ७०५१३ मार्च: मेजर १३८, मायक्रो ८३३१४ मार्च: मेजर १४४, मायक्रो ८३३१५ मार्च: मेजर १४६, मायक्रो ८९५१६ मार्च: मेजर १५८, मायक्रो ८९५१७ मार्च: मेजर १४५, मायक्रो ७५२१८ मार्च: मेजर १५९, मायक्रो ८३२ १९ मार्च:  मेजर १७९, मायक्रो ८३२ २० मार्च: मेजर १८२, मायक्रो ८४५२१ मार्च: मेजर १८२, मायक्रो ८४५२२ मार्च: मेजर २०२, मायक्रो ७६६शहरात दहा मार्चपर्यंत १६९ मेजर आणि ६०२ मायक्रो कंटेन्मेंट झोन होते. तर सद्यस्थितीत २१५ मेजर आणि ८७९ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्या