शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता सिग्नलला डावीकडे ‘बिनदिक्कत’पणे वळता येणार : चौकातली वाहतूक कोंडी कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 15:11 IST

प्रत्येक चौकात सिग्नलला वाहनचालकांना डावीकडे वळण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देदिल्ली, चंदीगड, बेंगळुरू इत्यादी मोठ्या शहरांमध्ये डावीकडे थेट वळण्यास परवानगी

पुणे : सिग्नलला उभे राहिल्यानंतर डावीकडे वळण घेणाऱ्या वाहनचालकांनाही विनाकारण चौकात ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे इंधन आणि वेळ यांचा अपव्यय होतो. त्यामुळे प्रत्येक चौकात सिग्नलला वाहनचालकांना डावीकडे वळण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीने शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंजूर केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

सिग्नलला ‘लेफ्ट हॅन्ड फ्री’ असावा असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अ‍ॅड. भैय्यासाहेब जाधव आणि शिवसेनेचे नगरसेवक अविनाश साळवे यांनी समितीसमोर ठेवला होता. समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली असून मुख्यसभेने मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शहरातील अनेक चौक अरुंद आहेत. तसेच या चौकांना जोडणा-या रस्त्यांची रुंदीही कमी आहे. त्यातच चौकाचौकात अतिक्रमणे वाढत चालली आहेत. त्यामुळे सिग्नल लागताच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे ज्यांना डावीकडे वळायचे असते त्यांनाही वळता येत नाही. जर या वाहनचालकांना चौकात न थांबता थेट वळण्यास परवानगी दिली तर वाहतुकीची होणारी कोंडी 33 टक्क्यांनी कमी होऊ शकते असे जगताप यांनी सांगितले.

हा प्रस्ताव आता मुख्य सभेसमोर ठेवला जाणार असून चौकातील वाहतुक व्यवस्था, उपलब्ध जागा आणि नकाशा याचाही विचार केला जाणार आहे. मुख्यसभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव वाहतुक पोलिसांकडे पाठविला जाणार आहे.=====दिल्ली, चंदीगड, बेंगळुरू इत्यादी मोठ्या शहरांमध्ये, प्रत्येक चौकात डावीकडे थेट वळण्यास परवानगी आहे. या शहरांमधील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. या शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रत्येक चौकात वाहनचालकांना डावीकडे वळण घेण्यास परवानगी देणारा प्रस्ताव शहर सुधारण समितीने मंजुर केला आहे.  ‘लेफ्ट वे फ्री’ केल्यानंतर वळणावरील वाहतुक नियंत्रण दिव्यांची (सिग्नल) आवश्यकता भासणार नाही. तसेच चौकातील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होईल.- प्रसन्न जगताप, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाtraffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी