पदपथ जणू पथारीवाल्यांसााठीच, चालणारे रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:10 IST2020-12-06T04:10:31+5:302020-12-06T04:10:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: कोरोना टाळेबंदीत ओस पडलेले पदपथ आता अनलॉक नंतर आता पुन्हा गजबजले आहेत. मध्य पुण्यातील प्रामुख्याने ...

The sidewalk is like a pedestrian, on a walking path | पदपथ जणू पथारीवाल्यांसााठीच, चालणारे रस्त्यावर

पदपथ जणू पथारीवाल्यांसााठीच, चालणारे रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: कोरोना टाळेबंदीत ओस पडलेले पदपथ आता अनलॉक नंतर आता पुन्हा गजबजले आहेत. मध्य पुण्यातील प्रामुख्याने लक्ष्मी रस्ता, मंडई, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता या भागातील पदपथांवर एकतर पथारीवाले तरी आहेत, किंवा मग पदपथाला लागून असलेल्या दुकानदारांनीच त्यांचा माल रस्त्यावर ठेवून पदपथ अडवले आहेत. पदपथावरील प्रचंड गर्दीमध्ये कोरोना संसर्गाचे भान सुटले आहे.

शहरातील पथारीवाले, हातगाडीवाल्यांची संख्या ५० हजारापेक्षा जास्त आहे. महापालिकेकडे नोंदणी झालेले यात फक्त १८ हजार आहेत. कोरोना टाळेबंदीने हे सगळेच विवंचनेत होते. आता मात्र यांच्या गर्दीमुळे पदपथांवरून चालणे मुश्किल झाले आहे. कपड्यांपासून ते दागिन्यांपर्यंतचा सर्व माल या विक्रेत्यांकडे मिळतो. शहरातले अनेक पदपथ भाजी विक्रेत्यांनी व खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी अडवले आहेत. या गाड्यांवरचा माल तुलनेने स्वस्त असल्याने नोकरदार वर्ग पदपथाच्या कडेला गाडी लावून रस्ता अडवतो आणि खरेदी करत बसतो. यामुळेही रस्ते कोंडी वाढली आहे.

विक्रेत्यांनी व ग्राहकांनी मास्क घातलेला नसतो. बहुसंख्य विक्रेते दिवसभर एकाच जागेवर बसून व्यवसाय करतात. त्यांचा माल अनेकजण हाताळतात. यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. सॅनिटायझर विक्रेत्याकडे नसते, ग्राहकांकडे असले तरी खरेदीच्या गडबडीत त्याचा वापर करण्याचे भान नसते. सकाळी ११ वाजेपर्यंत व दुपारी ४ वाजल्यापासून ते रात्री ९ पर्यंत रस्त्यावरील बाजार भरतो. बहुसंख्य विक्रेते बेकायदाच आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई होते, मात्र त्यानंतर थोड्याच वेळात ते पुन्हा आपल्या जागेवर परत येतात आणि व्यवसाय सुरू करतात.

Web Title: The sidewalk is like a pedestrian, on a walking path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.