शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सुमारे तीनशे वर्षांच्या परंपरेत भोर संस्थानिकांच्या राजप्रसादात श्रीराम जन्मोत्सव साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 9:48 PM

सुमारे ३०० वर्षाची परंपरा असलेल्या भोरचे संस्थानिकांच्या राजप्रसादाच्या दरबार सभागृहात श्रीरामाचा जन्मोत्सव पारंपारिक पध्दतीने दुपारी १२ वाजता साजरा करण्यात आला.

 भोर : सुमारे ३०० वर्षाची परंपरा असलेल्या भोरचे संस्थानिकांच्या राजप्रसादाच्या दरबार सभागृहात पंतसचिवांचे कुलदैवत असलेल्या श्रीरामाचा जन्मोत्सव (श्रीरामनवमी) पारंपारिक पध्दतीने दुपारी १२ वाजता मोठया उत्साहात श्रीरामाच्या जयघोषात साजरा करण्यात आला.यावेळी शहरासह ग्रामिण भागातील भाविक  मोठया प्रमाणात उपस्थित होते.  या रामजन्मोत्सवाला भोरचे राजे चिमणाजी उर्फ आबाराजे पंतसचिव, त्यांच्या पत्नी उर्मिलादेवी,पुत्र राजेश पंसचिव,योगेशपंतसचिव व नातु पार्थ स्वातीदेवी पंतसचिव,गायत्रीदेवी, इशादेवी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील,नगराध्यक्ष निर्मला आवारे,के.टी शेटे,जगदीश किरवे बाळासो गरुड, निसार नालबंद,सिमा तनपुरे व शहरासह ग्रमिण भागातील भविक मोठया प्रमाणात उपस्थित होते. आज सकाळी ११ वाजता राजप्रसादातुन राजघराण्यातील प्रमुख व्यक्ती व नागरिक सुरभी ब्रॉस बँन्ड व भगवा ग्रुपचे ढोलताशा पथक येथील ढोलताशा व स्वरानंद ग्रुप यांच्या गायन वादयाच्या साथीने सजवलेल्या पालखीतुन छत्र,चामरे,अबदागिरी घेतलेले मानकरी यांच्यासह राजसुर्वणकार यांच्याकडे स्वर्गीय राममुर्ती आणण्यासाठी गेले.मग मुर्ती उत्साही मिरवणुकीने पालखीतुन राजप्रसादात आणताना नागरिकांनी पुष्पवृष्टी केली.नंतर ही मूर्ती सजवलेल्या पाळण्यात ठेवण्यात आली.पाळणा गायला आणी दुपारी ठिक १२ वाजता आबारांजेचे पुत्र राजेश,योगेश यांनी पाळण्याची दोरी ओढुन रामाच्या पाळण्यावर पुष्पवृष्टी करुन श्रीरामाचा जयजयकार करत घोषणा दिल्या.श्रीरामचे भजन राजाभाऊ दुसंगे यांनी गायले तर पाळणा हौसाबाई काळे यांनी गायला.   यावेळी हजारो भविक भक्तांना सुंटवडा व महाप्रसाद वाटप करण्यात आला.श्रीराम हे भोरचे संस्थानिक पंतसचिवांचे कुलदैवत असल्याने १७२० सालापासुन हा जन्मोत्सव आणी सचिवपदाचे संस्थापक शंकरजी नाारायण यांच्या पुण्यस्मरणाचा उत्सव असे दोन्ही उत्सव वैभवाने व भव्यतेने साजरे करण्याची परंपरा सुमारे ३०० वर्षापासुन सुरु आहे.श्रीरामनवमी निमित्त आज पहाटे पासुनच भोर शहरात मोठया उत्साहाचे वातावरण होते. सुभाष चौकात सुभाष मंडळाच्या वतीने मंगळपेठेत भारती हॉस्पीटलने तर राजवाडयात भिमराव शिंदे यांच्या वतीने भाविकांना  पाणपोईची सोय करण्यात आली होती.    शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या घर,दुकानासमोर रांगोळी  काढली होती.राजवाडा परिसरात विविध प्रकारची प्लास्टीकची खेळणी,मातीची भांडी खादय पदार्थाचे ,थंड पेयाचे कलिंगडाचे व विविध फळाच्या उसाच्या रसाचे स्टॉल लावण्यात आले होते.लहान मुलांना व वृध्दांना खेळण्यासाठी रेल्वेगाडी झोपाळा,मिकी माऊस,जंम्पींग जॅक,रेल्वे याची सोय होती त्यामुळे दिवसभर चिमुकल्यांसह आबालवृधदांनी एकच गर्दी केली होती.नोकरी निमित्त बाहेर गावाला असणारे चाकर माने श्रीराम नवमीसाठी आपल्या कुटुंबासह आवर्जून उपस्थित झाले होते उन्हाची तीव्रता अधिक असल्याने भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोईची सुविधा  राजवाडयात करण्यात आली होती.सकाळ पासुन शहरासह ग्रामीण  भागातील भाविकांनी दर्शनासाठी राजवाडयात रांगा लावल्या होत्या. भोर पोलीसांकडुन पोलीस निरीक्षक राजु मोरे यांच्या मार्गदर्शना खाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.    भोरचे ग्रामदैवत जानाईदेवी यात्रा व श्रीरामनवमी निनित्त राजबागेत कुस्त्याचा जंगी आखाडा आयोजित केला होता.३ हजारापासुन अडीच लाख इनाम व जानाई केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात नामांकित महाराष्ट्र केसरी पैलवानांनी हजेरी लावली भोर पासुन १७ किलोमीटरवर असलेल्या कारी(ता.भोर) येथील सरदार कान्होजी जेधेच्या वाडयात जेधेंचे वंशज रणधीर जेधे,युवराज जेधे व कुटुंबीयांनी पारंपरिक पध्दतीने श्रीरामनवमी साजरी करण्यात केली.     मागील ३०० वर्षापासुन अखंडपणे आमचे कुलदैवत असलेल्या श्रीरामाचा जन्मोत्सव सोहळा श्रीरामनवमी पारंपारीक पध्दतीने साजरी करित असुन यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे भोरचे राजेश पंतसचिव यांनी सांगितले.   मागील सुमारे ३०० वर्षापासुन पारंपारिक पध्दतीने भोरच्या राजवाडयात मोठया उत्साहात रामाची जन्मोत्सव (श्रीरामनवमी) राजेशाही पध्दतीने श्रीरामनवमी साजरी केली त्याचा फोटो पाठवला आहे.              

टॅग्स :PuneपुणेRam Navamiराम नवमी