कर्नाटकातील मराठी जनतेला वाऱ्यावर सोडून राज्यात सुडाचे राजकारण : श्रीपाल सबनीस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 09:36 PM2023-01-12T21:36:14+5:302023-01-12T21:37:26+5:30

वाल्हे येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सबनीस बोलत होते ...

Shripal Sabnis Marathi people of Karnataka left in the wind, revenge politics in the state | कर्नाटकातील मराठी जनतेला वाऱ्यावर सोडून राज्यात सुडाचे राजकारण : श्रीपाल सबनीस

कर्नाटकातील मराठी जनतेला वाऱ्यावर सोडून राज्यात सुडाचे राजकारण : श्रीपाल सबनीस

Next

वाल्हे (पुणे) : महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटकातील मराठी जनतेला वाऱ्यावर सोडले असून, राज्यात सुडाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लेखक विचारवंत श्रीपाल सबनीस यांनी केला आहे.

वाल्हे येथे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. वाल्हे येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक संतोष ढवळे यांनी लिहिलेल्या आम्ही वाल्हेकर या पुस्तक प्रकाशन मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे हे अध्यक्ष होते.

तर यावेळी साहित्यिक रावसाहेब पवार, भाजप नेते सचिन लंबाते, माजी सरपंच दत्तात्रय पवार, उपसरपंच अंजली कुमठेकर, सूर्यकांत भुजबळ, सूर्यकांत पवार, चेअरमन बाळासाहेब भुजबळ, कृषी अधिकारी सिद्राम भुजबळ, अशोक बरकडे, चेतन शहा, पी. एस. जाधव, फत्तेसिंग पवार, राजन गायकवाड, छाया शहा, ए. एम. पठाण, इक्बाल आतार, हनुमंत पवार, किरण कुमठेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. संतोष ढवळे यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुमठेकर यांनी सूत्रसंचालन केले. अमोल खवले यांनी आभार मानले.

Web Title: Shripal Sabnis Marathi people of Karnataka left in the wind, revenge politics in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.