श्री पूना मोढ मित्रमंडळ घरपोच मोफत टिफिन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:12 IST2021-05-09T04:12:22+5:302021-05-09T04:12:22+5:30

घरपोच मोफत टिफिन सेवा राबविण्यात येत आहे. बहुतांश व्यापार- कामधंदे बंद आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे मासिक उत्पन्न नाही. ...

Shri Poona Modh Mitramandal Home Decoration Free Tiffin Service | श्री पूना मोढ मित्रमंडळ घरपोच मोफत टिफिन सेवा

श्री पूना मोढ मित्रमंडळ घरपोच मोफत टिफिन सेवा

घरपोच मोफत टिफिन सेवा राबविण्यात येत आहे. बहुतांश व्यापार- कामधंदे बंद आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे मासिक उत्पन्न नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कुटुंबच्या कुटुंबं कोरोना महामारीने बाधित झाले आहेत. दवाखान्यात जागा नसल्यामुळे लोक घरी विलगीकरण (होम क्वारंटाईन) मध्ये राहतात. अशा अवस्थेत स्वयंपाक कोण बनविणार? या परिस्थितीशी सामना करण्यासाठी पुणे शहरातील एका व्यक्तीने होम क्वारंटाईन कोविड रुग्णांना ७ दिवस घरपोच मोफत टिफिन सेवा हा उपक्रम राबविण्यात येते आहे.

हा उपक्रम २६ ऑगस्ट २०२० पासून श्री पूना मोढ मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शाह व त्यांचे १३ सहकारी राबवत आहेत. आजपर्यंत जवळ जवळ ११००० मोफत टिफिन कोविड रुग्णांना घरपोच वाटप केले. कोविड रुग्णांना दोन्ही वेळ सकाळ आणि संध्याकाळ ताजे, सकस व गरम जेवण काळजीपूर्वक रीतीने घरपोच दिले जाते.

मोफत टिफिन सेवेच्या वितरणाची जबाबदारी अमिताबेन शाह, पंकजभाई शाह, जयंतभाई शाह, मनेशभाई शाह, भावेशभाई शाह,बकुलचंद्र वाणी, शैलेशभाई गुजराथी, सोनलबेन गुजराथी, सुजाताबेन जामदार आदी मंडळ चे कार्यकारी सदस्य पुणे शहरातील वेगळ्या वेगळ्या भागात कुशलतेने सांभाळत आहेत.

Web Title: Shri Poona Modh Mitramandal Home Decoration Free Tiffin Service