बारामती : श्री.छत्रपती सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूकीचा मंगळवारी(दि २) अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मंगळवारी(दि २८) उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे आणि सर्वपक्षीय पॅनलचे नेते पृथवीराज जाचक यांची काही उमेदवारांच्या नावावरुन चर्चा फिसकटल्याचे चित्र होते. मात्र,गुरुवारी (दि १) महाराष्ट्रदिनी पुन्हा चर्चा होऊन उमेदवारांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
शुक्रवारी(दि २) सर्वपक्षीय पॅनलचे समन्वयक किरण गुजर, राष्ट्रवादी काॅग्रेसचे तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये जुन्या संचालक मंडळाला पुर्णपणे वगळण्यात आले आहे. संपुर्ण २१ जागांवर नविन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यामध्ये गट नं. १ लासुर्णे मधुन पृथ्वीराज साहेबराव जाचक, शरद शिवाजी जामदार.गट नं. २ सणसर रामचंद्र विनायक निंबाळकर, शिवाजी रामराव निंबाळकर.गट नं. ३ पृथ्वीराज श्रीनिवास घोलप, गणपत सोपान कदम.गट नं. ४ अंथुर्णे विठ्ठल पांडुरंग शिंगाडे, प्रशांत दासा दराडे, अजित हरीशचंद्र नरुटें.गट नं. ५ सोनगांव अनिल सीताराम काटे, बाळासाहेब बापूराव कोळेकर, संतोष शिवाजी मासाळ. गट नं. ६ गुणवडी कैलास रामचंद्र गावडे, सतिश बापूराव देवकाते, निलेश दत्तात्रय टिळेकर.‘ब‘ वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन मधुन अशोक संभाजीराव पाटील.अनुसूचित जाती / जमाती साठी मंथन बबनराव कांबळे.महिला राखीव प्रतिनिधी राजपुरे माधुरी सागर राजपुरे, सुचिता सचिन सपकळ. इतर मागास प्रवर्ग तानाजी ज्ञानदेव शिंदे. भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास मधुन डॉ. योगेश बाबासाहेब पाटील यांनी सर्वपक्षीय श्री जय भवानीमाता पॅनलमधुन उमेदवारी देण्यात आल्याचे गुजर अणि शिंदे यांनी सांगितले.
या निवडणुकीकरिता मोठ्या प्रमाणावर मान्यवर सभासदांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमुख्यमंत्री पवार, क्रिडामंत्री भरणे ,पॅनलप्रमुख जाचक यांनी एकत्र येवून सर्वसमावेशक सर्व पक्षीय श्री जय भवानी माता पॅनल केले आहे. २१ जागांचे संचालक मंडळासाठी अनेक मान्यवरांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. सर्वच उमेदवार हे तुल्यबळ आहे परंतु पॅनल मध्ये उमेदवारांना घेत असताना अनेक मान्यवरांना थांबावे लागणार आहे. संचालक मंडळाची मर्यादित संख्या लक्षात घेता यामधील उमेदवारी दिलेल्या उमेदवाराव्यतिरिक्त इतर सर्वांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घ्यावी. तसेच अडचणीत असलेल्या आपल्या कारखन्याची निवडणूक बिनविरोध करणेस सहकार्य करावे,असे आवाहन गुजर आणि शिंदे यांनी केले आहे.
...कोणीही संभ्रमावस्था निर्माण करू नये
सर्वच उमेदवार योग्य अन् पात्रतेचे आहेत. पण आपल्याला काही मर्यादा असल्याने आपण त्यातील २१ जणांना पॅनल मधून उमेदवारी जाहीर केलेली आहे. ते सर्व सभासदांना केंद्रस्थानी ठेवून काम करतील. त्यामुळे या २१ जणांव्यतिरिक्त मी कोणत्याही अपक्ष उमेदवारांना समर्थन दिलेले नाही. त्यामुळे कोणीही संभ्रमावस्था निर्माण करू नये,असे आवाहन पॅनलप्रमुख पृथ्वीराज जाचक यांनी केले आहे.