श्रावणी देशमुख, अंकित राय यांचा मानांकितांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:13 IST2021-02-25T04:13:44+5:302021-02-25T04:13:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चौथ्या पीएमडीटीए-केपीआयटी लिटल कुमार चॅम्पियनशिप सीरिज २०२१ स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अंकित ...

Shravan Deshmukh, Ankit Rai's push to the standard | श्रावणी देशमुख, अंकित राय यांचा मानांकितांना धक्का

श्रावणी देशमुख, अंकित राय यांचा मानांकितांना धक्का

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : चौथ्या पीएमडीटीए-केपीआयटी लिटल कुमार चॅम्पियनशिप सीरिज २०२१ स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अंकित राय याने, तर मुलींच्या गटात श्रावणी देशमुख या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकीत अंकित राय याने अव्वल मानांकित आदित्य आयंगरचा ६-१ असा सहज पराभव करून सनसनाटी निकाल नोंदविला. चौथ्या मानांकित अर्जुन कीर्तनेने नील केळकरचा ६-४ असा संघर्षपूर्ण पराभव केला.

मुलींच्या याच गटात श्रावणी देशमुख हिने अव्वल मानांकित देवांशी प्रभूदेसाईचे आव्हान ६-३ असे संपुष्टात आणले. तिसऱ्या मानांकित निशिता देसाई हिने सहाव्या मानांकित स्नेहा स्वामीला ६-३ असे पराभूत केले. १२ वर्षांखालील मुलांच्या गटात वैष्णव रानवडे, स्मित उंडरे, नील केळकर, क्रिशांक जोशी यांनी तर, मुलींच्या गटात काव्या देशमुख, रिशीता पाटील, ध्रुवा माने, सृष्टी सूर्यवंशी या खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

Web Title: Shravan Deshmukh, Ankit Rai's push to the standard