शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनाही वारी पाहता यावी यासाठी फेसबुक दिंडीची नेत्रवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 19:59 IST

फेसबुक दिंडीच्या माध्यमातून यंदा नेत्रवारी हा उपक्रम राबविण्यात येणार असून या माध्यमातून लाेकांना नेत्रदान करण्याचे अावाहन करण्यात येणार अाहे.

ठळक मुद्देफेसबुक दिंडीचे यंदाचे अाठवे वर्षनेत्रदानाचे करण्यात येणार अावाहन

पुणे :  " पंढरीच्या वारीचा हा अनुपम्य सुखसोहळा             पाहीन मी याची देही याची डोळा "पंढरीची वारी ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी अानंददायी असा साेहळा असताे. लाखाे वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात विठुनामाचा जप करत अाळंदी व देहूकडून पंढरीकडे जात असतात. ज्यांना हा दैदिप्यमान साेहळा पाहता येत नाही त्यांच्यासाठी पुण्यातील तरुण मंडळी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून ही वारी त्यांच्यापर्यंत पाेहचवत असतात. परंतु यंदा याही पुढे जात नेत्रहीन बांधवांना सुद्धा ही वारी याची देही याची डाेळा पाहता यावी यासाठी फेसबुक दिंडीच्या वतीने नेत्रवारी ही संकल्पलना यंदाच्या वारीत राबविण्यात येत अाहे. या माध्यमातून नागरिकांना नेत्रदान करण्याचे अावाहन करण्यात येत असून त्यासाठी एका अॅपची निर्मिती करण्यात अाली अाहे. 

    गेल्या अाठ वर्षांपासून फेसबुक दिंडीच्या माध्यमातून पुण्यातील तरुण वारी साेहळा जगभरातील लाेकांपर्यंत पाेहचवत अाहेत. स्वप्निल माेरे याने या फेसबुक दिंडीची स्थापना केली. त्यानंतर दरवर्षी वारीचे फाेटाे, अपडेटस तसेच वारीचे अाकर्षक व्हिडीअाे या फेसबुक दिंडीच्या टीमच्या माध्यमातून देशादेशीच्या मराठी बांधवांपर्यंत त्यांनी पाेहचवले. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी वारीच्या वार्तांकनाबराेबरच एक सामाजिक संदेश देण्याचे काम सुरु केले अाहे. यंदा नेत्रवारी ही संकल्पना घेऊन लाेकांना नेत्रदान करण्याचे अावाहन त्यांच्याकडून करण्यात येत अाहे. व्यंकटेश परिवार, औरंगाबाद या अंध बांधवांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत अाहे. 2016 साली “पाणी वाचवा”  हा संदेश देण्यात अाला हाेता तर गतवर्षी वारी ती ची हा उपक्रम हाती घेण्यात अाला हाेता. या दाेन्ही उपक्रमांना नागरिकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. फेसबुक दिंडीच्या माध्यमातून यंदा वारीचे एक थिम साॅंग सुद्धा तयार करण्यात अाले असून हे गाणं अाता महाराष्ट्रातील जनतेच्या हृद्ययाचा अाता ठाव घेत अाहे. 

    याबाबत बाेलताना स्वप्निल माेरे म्हणाला, गेल्या अाठ वर्षांपासून फेसबुक दिंडीच्या माध्यमातून वारी घरघरांमध्ये पाेहचविण्याचं काम अाम्ही करीत अाहाेत. फेसबुक दिंडीच्या माध्यमातून वारी नागरिकांना अनुभवता येत हाेती. परंतु ज्यांना डाेळे नाहीत त्यांनाही या वारीचा अनुभव घेता यावा यासाठी यंदा अाम्ही नेत्रवारी करण्याचा निर्णय घेतला. 20 लाखांहून अधिक नेत्रहिनांच्या अायुष्यात अंधकार अाहे. तर त्या प्रमाणात नेत्रदान करणारे लाेक हे 2 चे 3 टक्के अाहेत. त्यामुळे समाजात एक जागरुकता निर्माण करण्यासाठी यंदा नेत्रवारी उपक्रम राबविण्यात येत अाहे. त्यासाठी फेसबुक दिंडीचे अॅप तयार करण्यात अाले असून नेत्रवारीचा फार्मही त्यात देण्यात अाला अाहे. नागरिक अाॅनलाईन फार्म भरु शकणार अाहेत. त्याचबराेबर यंदा फेसबुक दिंडीच्या माध्यमातून 360 काेणातील फाेटाे पाहण्याची संधी लाेकांना मिळणार अाहे. 

टॅग्स :PuneपुणेFacebookफेसबुकnewsबातम्याsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी