कामगारांचा हिसका दाखवू

By Admin | Updated: April 28, 2017 05:58 IST2017-04-28T05:54:10+5:302017-04-28T05:58:51+5:30

निवडणुका आल्या की भाजपा सरकार नुसते आश्वासने देत आहे. मात्र, भाजपाकडून आश्वासनांची पूर्तता होत नाही. यासाठी

Show the joke of the workers | कामगारांचा हिसका दाखवू

कामगारांचा हिसका दाखवू

पिंपरी : निवडणुका आल्या की भाजपा सरकार नुसते आश्वासने देत आहे. मात्र, भाजपाकडून आश्वासनांची पूर्तता होत नाही. यासाठी सर्वपक्षीयांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे आवश्यक आहे. कामगारांचा हिसका जोपर्यंत या सरकारला दाखवला जात नाही, तोपर्यंत या कामगार नगरीतील समस्या सुटणार नाहीत, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला.
पिंपरी -चिंचवड शहरात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या दोनदिवसीय अधिवेशन पार पडले. या वेळी शहरातील सर्व पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची भाजपला आठवण करून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीयांनी बुधवारी चिंचवड येथील महावीर चौैकात ‘आश्वासनांची आठवण’ आंदोलन करून लाक्षणिक उपोषणही केले होते. या आंदोलकांना धनंजय मुंडे यांनी गुरुवारी मार्गदर्शन केले.
मुंडे पुढे म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे तसेच शास्तीकर माफीचे आश्वासन दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांकडून पिंपरी-चिंचवडकरांची घोर निराशा झाल्याचे सांगत भाजपा सरकारला जरी आश्वासनांचा विसर पडला असला तरी येत्या पावसाळी अधिवेशनात त्यासाठी संघर्ष करणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Show the joke of the workers