शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण जागृतीसाठी लघुपट हे प्रभावी माध्यम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:10 IST

मेघराज राजेभोसले : राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण मेघराज राजेभासले : राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण पुणे ...

मेघराज राजेभोसले : राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण

मेघराज राजेभासले : राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण

पुणे : ‘पर्यावरणाचा र्‍हास ही समाजासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. तरुण पिढीमध्ये पर्यावरणासंदर्भात जागृती करणे गरजेचे असून, या दृष्टीने लघुपट हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे,’ असे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभासले यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत पुणे महापालिका, माय अर्थ फाउंडेशन, सस्टेनेबल इनिशिएटिव्ह, एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया आणि ध्यास प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय पर्यावरण लघुपट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. दिग्दर्शक नितीन सुपेकर, लिज्जत पापड उद्योग समूहाचे संचालक सुरेश कोते, पुणे मनपा पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, ईसीआयचे सदस्य दत्तात्रय देवळे, किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे वीरेंद्र चित्राव, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, वनराईचे सचिव अमित वाडेकर, संयोजक अनंत घरत, अमोल उंबराजे, ललित राठी सोमनाथ पाटील उपस्थित होते.

महापालिकेने कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, यासाठी तयार केलेला ‘संकल्प’ आणि पी. के भांडवलकर यांचा ‘मांजा’ हे लघुपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरले. ‘अ‍ॅडिक्शन’ या लघुपटासाठी अक्षय वासकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले. सुनील डांगे यांच्या अवनी हा सर्वोत्कृष्ट माहितीपट ठरला. ‘प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट’ या लघुपटाची संकल्पना सर्वोत्कृष्ट ठरली. हितेंद्र सोमानी यांचा ‘सुरक्षित भविष्य’ हा लघुपट सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेशनपट ठरला. ‘जीवाश्म’ या लघुपटासाठी जितेंद्र घाडगे यांना सर्वोत्कृष्ट संवादलेखनाचे, सचिन मंगज यांना ‘हिरवी आशा’ लघुपटाच्या छायाचित्रीकरणासाठी पारितोषिक मिळाले. ‘गिफ्ट’, ‘अदृश्य’ आणि ‘कचरा विलगीकरण’ या लघुपटांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.

सोमनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अनंत घरत यांनी प्रास्ताविक केले. अमोल उंबराजे यांनी आभार मानले. ज्येष्ठ लेखक सुभाषचंद्र जाधव यांनी महोत्सवाच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले.