लोणी काळभोरमध्ये वर्गणीवरून दुकानदाराला मारहाण; चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 04:08 PM2023-09-12T16:08:11+5:302023-09-12T16:12:35+5:30

याप्रकरणी चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Shopkeeper beat up over subscription in Loni Kalbhor; Extortion case against four | लोणी काळभोरमध्ये वर्गणीवरून दुकानदाराला मारहाण; चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा

लोणी काळभोरमध्ये वर्गणीवरून दुकानदाराला मारहाण; चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा

googlenewsNext

लोणी काळभोर (पुणे) : गणपतीच्या वर्गणीवरून मंडळाच्या सदस्यांनी किराणा दुकानदाराला मारहाण केल्याची घटना लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोणी स्टेशन परिसरात रविवारी (दि. १०)घडली. याप्रकरणी चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवम जयपाल सिंग ऊर्फ मुन्ना (वय २७), तुषार संजय थोरात (वय १९), निखिल दिलीप कांबळे (वय १९) व त्यांच्या एका साथीदार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दिनेश भिकाराम गोरा (वय २०, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश गोरा यांचे लोणी स्टेशन परिसरात न्यू बालाजी किराणा स्टोअर्स नावाने दुकान आहे. मागील तीन दिवसांपूर्वी सार्वजनिक मंडळाच्या काही तरुणांनी गोरा यांना ३ हजार रुपयांची वर्गणीची पावती दिली होती. यावेळी रविवारी संध्याकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास १० ते १५ तरुणांचा गट वर्गणी मागण्यासाठी किराणा दुकानात घुसला. यावेळी गोरा यांनी एवढी रक्कम देऊ शकत नाही. तुम्ही काहीतरी कमी करून घ्या, असे म्हणाले. तेव्हा यातील एकाने त्याच्या कानाखाली जोरदार फटका मारला. पाठीमागे उभे असलेल्या काही तरुणांनी दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करून दमदाटी केली. तसेच, पुन्हा दुकानात घुसून मारहाण केली. लोणी स्टेशन चौकात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.

घडलेल्या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे उपस्थित होते. त्यांनी किराणा दुकानात गणपती वर्गणीवरून भांडण करणाऱ्या युवकांना सज्जड दम देऊन हुसकावून लावल्याने वाद वाढला नाही.

Web Title: Shopkeeper beat up over subscription in Loni Kalbhor; Extortion case against four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.