पिरंगुट येथे आगीत दुकान खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:17 IST2018-03-14T01:17:49+5:302018-03-14T01:17:49+5:30

पिरंगुट (ता. मुळशी) येथील भरचौकामध्ये असलेल्या भवानी इलेक्ट्रिकल या दुकानाला आग लागून जवळपास ५२ लाखांचा माल जळून खाक झाला. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Shop the fire at Pirangut | पिरंगुट येथे आगीत दुकान खाक

पिरंगुट येथे आगीत दुकान खाक

पिरंगुट : पिरंगुट (ता. मुळशी) येथील भरचौकामध्ये असलेल्या भवानी इलेक्ट्रिकल या दुकानाला आग लागून जवळपास ५२ लाखांचा माल जळून खाक झाला. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सावताराम गेपरजी देवासी यांच्या मालकीचे भवानी हे दुकान असून ते नेहमीप्रमाणे आपले कामकाज आटपून रात्री अकराला घरी गेले. रात्री बाराच्या आसपास त्यांच्या दुकानातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे नागरिकांनी पहिले. तेव्हा या धुराचे लोट पाहून शेजारच्या लोकांनी त्यांना फोन करून बोलावून घेतले.
दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यामधून आगीचे लोंढे बाहेर येत होते. पाणी मारून आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु तो प्रयत्न असफल झाला. पुण्यावरून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या एक वाजता घटनास्थळी झाल्या. त्यानंतर आग पहाटेच्या तीन वाजता आटोक्यात आली.
>आग पहाटेच्या तीन वाजता आटोक्यात
दुकानाच्या बाजूला लागूनच कपड्याचे मोठे दुकान आहे. सुदैवाने या दुकानाला या आगीचा फटका न बसल्याने खूप मोठी दुर्घटना टळली.
या दुकानाला लागलेली ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Web Title: Shop the fire at Pirangut