The shooting of Tabu's movie in Pune was stopped | पुण्यात तब्बूच्या चित्रपटाचे शूटिंग पाडले बंद

पुण्यात तब्बूच्या चित्रपटाचे शूटिंग पाडले बंद

 ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 1  - पुण्यात अभिनेत्री तब्बूच्या चित्रपटाचं शूटिंग बंद पाडण्यात आल्याची माहिती आहे. पुण्यात खडकी कॅन्टॉनमेंट भागात तब्बूच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरु होते. शूटिंगमुळे ट्रॅफीक जॅम झाल्याने स्थानिकांनी हे शूटिंग बंद पाडले. चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शकाकडे चित्रीकरणासाठी आवश्यक परवानग्याही नव्हत्या. 
 
चित्रीकरणस्थळी विरोध प्रदर्शन सुरु झाल्यानंतर तब्बू आपल्या कारमध्ये बसून निघून गेली. तब्बूने अलीकडेच एका मुलाखीतत तिच्या अविवाहीत असण्यामागचा खुलासा केल्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री तब्बू हिने स्वतःच्या आयुष्याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. 
 
आणखी वाचा
 
तब्बूनं अनेक अभिनेत्यांसोबत चित्रपटात काम केलंय. मात्र तब्बूचा विजयपथ हा सिनेमा तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.तब्बूच्या या खुलाश्यानंतर चित्रपटसृष्टीत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. अभिनेत्री तब्बूचे आजही अनेक चाहते आहेत. 80 ते 90च्या दशकात तब्बूच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. 1980मधल्या बाजार चित्रपटात तब्बू पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट गाजवले.

Web Title: The shooting of Tabu's movie in Pune was stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.